धाकट्या पंढरपूरात संत मुक्ताबाईच्या चरणी लोटला सुवासिनीची जनसागर; इंदापूरात मकर संक्रांत उत्साहात

धाकट्या पंढरपूरात संत मुक्ताबाईच्या चरणी लोटला सुवासिनीची जनसागर; इंदापूरात मकर संक्रांत उत्साहात

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या प्रारंभाला येणारा पहिला सण म्हणजे महिलांचा मकर संक्रांतीचा सण. या सणाचे औचित्य साधून धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या शेळगाव (ता. इंदापूर) येथे संजीवनी समाधीस्थळ असलेल्या श्री. संत मुक्ताबाईच्या चरणी ओवसाण्यासाठी व दर्शनासाठी रविवारी (दि. १५) सुवासिनीचा जनसागर लोटला.

मकरसंक्रांतीच्या सणामुळे शेळगाव येथे संत मुक्ताबाई मंदिर, महादेव मंदिर, श्रीराम मंदिर व मारुती मंदिरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत इंदापूर तालुक्यातील शेळगाव, निमगाव केतकी, कडबनवाडी, गोतोंडी, व्याहाळी, शिरसटवाडी, घोरपडवाडी, पिटकेश्वरसह तालुक्यातील अन्य भागातील सुवासिनी दर्शन, ओवासणे व हळदी कुंकुवासाठी गर्दी केली होती. मकर संक्रांती निमित्ताने महिलांनी एकमेकांना चुडासह अन्य विविध वस्तू व तिळगूळ देत पारंपरिक पध्दतीने मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला.

यानिमित्ताने शनिवारी (दि. १४) मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली होती.  मंदिरात येणाऱ्या सुवासिनीची कोणत्याही गैरसोय होऊ नये म्हणून संत मुक्ताबाई देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आल होती. वालचंदनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news