

Pune molestation news
पुणे: दैनंदिन काम संपवून घरी जाण्याकरिता थेऊर फाटा येथे आलेल्या एका नोकरदार तरुणीचा लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका पिकअपचालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला.
याप्रकरणी एका 26 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर नंदू जाधव (वय 25) या पिकअपचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार थेऊर फाटा परिसरात शुक्रवारी (दि. 8) रोजी सव्वाअकराच्या सुमारास घडला. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही एका आस्थापनेत नोकरी करीत असून, दैनंदिन काम आटोपून थेऊर फाटा येथून राहत्या घरी जाण्याकरिता खासगी वाहनाची वाट पाहत हाती. या वेळी नंदू जाधव हा पिकअप घेऊन तरुणी उभी असलेल्या ठिकाणी आला. त्याने तरुणीला गाडीत बसण्याकरिता विचारणा केली. उशीर होत असल्याने होकार देत ती पिकअपमध्ये बसली. यानंतर आरोपीने फिर्यादीला अश्लील स्पर्श करून खांद्यावर हात टाकला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.