पुणे : सारसबागेत सुविधा करणार : आमदार रवींद्र धंगेकर

पुणे : सारसबागेत सुविधा करणार : आमदार रवींद्र धंगेकर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सारसबागेत व्यायामासाठी येणार्‍या पुणेकरांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन, असे आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले. सारसबाग मित्रपरिवारातर्फे सारसबागेत त्यांचा शिंदेशाही पगडी घालून सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. परिवाराचे प्रमुख संयोजक संजय नाईक तसेच नागरिकांतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

धंगेकर म्हणाले की, मी कसबा मतदारसंघातील विकासासाठी अहोरात्र काम करेन, याचा विश्वास नागरिकांना आहे. माझ्याकडे नागरिक कुठलेही काम घेऊन आल्यास मी त्यांना रिक्त हाताने परत पाठविणार नाही, असा मी शब्द देतो. मी सर्वसामान्यांसाठी आतापर्यंत केलेल्या कार्यामुळे मतदारांनी मला मतरूपी भरघोस आशीर्वाद दिला असून, तो मी कधी विसरू शकत नाही.

या प्रसंगी काँग्रेसचे नेते अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील, पीएमटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब अमराळे, माजी नगरसेवक विकास दांगट, किशोर खन्ना, बाळासाहेब पारगे, दीपक जगताप, अ‍ॅड. शिरीष शिंदे, शिवसेनेचे संदीप गायकवाड, नितीन काकडे, सुरेश देसाई, गुलाब जेधे, पोपटसेठ ओसवाल, अनिल गेलडा, वैशाली पाटील, जयश्री भोसले आदी उपस्थित होते. या प्रसंगी नागरिकांनी मतदारसंघातील समस्यांचे निवेदन धंगेकर यांना दिले. शैलेश आंदेकर यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news