

आळंदी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये व आळंदी शहराजवळ जे कत्तलखान्याचे आरक्षण टाकले आहे ते काढून टाकू. कत्तलखाना होऊ देणार नाही, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आळंदी येथील कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठब्दीपूर्तीनिमित्त आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळा सभागृहात कृतज्ञता सोहळा व गौरवग्रंथ प्रकाशन याचे आयोजन मंगळवारी (दि. ३) करण्यात आले होते. यानिमित राज्याचे मराठी भाषा तथा उद्योग मंत्री उदय सामंत हे या सोहळ्यास उपस्थित होते. (Latest Pune News)
यावेळी आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांनी मंत्री सामंत यांच्याकडे कत्तलखाना हलविण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी तातडीने त्याची दखल घेत असे आरक्षण उठवू असे जाहीर भाषणात सांगितले.