

पुणेः बुधवार ते शुक्रवार असा तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मात्र 10 जून पर्यंत कुठेही खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात 10 जून पर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसला तरी उत्तर भारतात तयार झालेल्या पश्चिमी चक्रवातामुळे 4 ते 6 जून या तीन दिवसांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. (Latest Pune News)
देशातील बहुतांश भागात 4 ते 7 जून रोजी पाऊस राहणार आहे.8 जून पासून देशाच्या सर्वच भागातून पाऊस कमी होणार आहे.10 ते 12 जून पासून पुन्हा मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.त्याचा जोर 15 जून पासून वाढेल.