पुणे : डेपोंसाठी पीएमआरडीएकडे जागा मागणार

पुणे : डेपोंसाठी पीएमआरडीएकडे जागा मागणार
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपीमार्फत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भागात बससेवा पुरविली जात आहे. परंतु, या भागात पीएमपीचा एकही डेपो नाही. परिणामी, पीएमआरडीए या भागात सेवा पुरविताना पीएमपी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पीएमपी प्रशासन आता पीएमआरडीएकडे डेपोसाठी जागेची मागणी करणार आहे.

पुणे युनिफाईड मेट्रोपोलिटन ट्रान्स्पोर्ट अ‍ॅथॉरीटीच्या ( पुम्टा) बैठकीत मिळालेल्या मान्यतेनंतर पीएमपीची सेवा आता पीएमआरडीए भागात विस्तारलेली आहे. मात्र, दिवसभर या भागात सेवा पुरविल्यावर या गाड्यांना रात्रीच्यावेळी शहरातच निवार्‍याला यावे लागत आहे. या वेळी अनेक गाड्या रात्री रिकाम्याच शहरात परततात आणि दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर पीएमआरडीए भागातील प्रवाशांना बससाठी वाट पहात बसावे लागते.

त्यामुळे त्या भागातील नागरिकांना सकाळी लवकर सेवा देता यावी आणि इंधनावरील खर्च वाचावा, याकरिता पीएमपी आता पीएमआरडीएकडे डेपोंसाठी जागेची मागणी करणार आहे. जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी डेपोची व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्यासोबतच शहराच्या विकास आराखड्यात पीएमपीच्या बस डेपोंसाठी अनेक ठिकाणी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश जागा शहरात आणि पिंपरी-चिंचवड भागात पीएमपी प्रशासनाला अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत. त्या मिळवून त्याठिकाणी डेपो उभारण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत.

पार्किंगची समस्या संपणार
पीएमपीकडे डेपोच्या जागा कमी पडत असल्यामुळे शहरात रात्रीच्या वेळी बर्‍याच ठिकाणी बस रस्त्यावरच पार्क झालेल्या दिसतात. मात्र, आता पीएमपीच्या बस पार्किंगची अडचण संपणार आहे. कारण, पीएमपी प्रशासन आता पुणे, पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए हद्दीत डेपोंच्या जागा वाढविण्यावर भर देणार आहे.

पीएमपीच्या गाड्या पीएमआरडीए हद्दीत सेवा पुरवितात. त्या ठिकाणी ताफ्यातील गाड्या सुरक्षित राहाव्यात आणि प्रवाशांच्या सोयीकरिता पीएमआरडीएच्या हद्दीत डेपोंची आवश्यकता आहे. त्याकरिता आम्ही पीएमआरडीएकडे डेपोंसाठी जागेची मागणी करणार आहोत.
                   – ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

पीएमपीची डेपोसंख्या
पुणे शहर – 12
पिंपरी-चिंचवड – 03
पीएमआरडीए – 00
ताफ्यातील एकूण डेपो – 15
प्रस्तावित – 03 (काम सुरू आहे.)
पिंपरीतील डेपो
निगडी डेपो (भक्ती-शक्ती)
पिंपरी-चिंचवड डेपो
भोसरी डेपो
काम सुरू असलेले डेपो
चर्‍होली – (ई-डेपो)
निगडी – (ई-डेपो)
अप्पर-इंदिरानगर डेपो
पुणे शहरातील डेपो
स्वारगेट न.ता.वाडी
कोथरूड कात्रज
हडपसर मार्केट यार्ड
पुणे स्टेशन भेकराईनगर
शेवाळवाडी बालेवाडी
बाणेर वाघोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news