पुणे : पत्नी दागिने घेऊन प्रियकरासोबत पसार

पुणे : पत्नी दागिने घेऊन प्रियकरासोबत पसार
Published on
Updated on

पुणे : प्रियकराबरोबर पळून जाताना पत्नीने घरातील रोकड, साडेपाच तोळे सोन्याचे दागिने तसेच माहेरहून रोकड तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या 15 वर्षांच्या मुलीने आईच्या प्रियकराने आपला विनयंभग केल्याचे घरातील नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.

एका 43 वर्षांच्या पतीने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 29 वर्षीय तरुण व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2022 मध्ये तसेच 18 एप्रिल 2023 रोजी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने फिर्यादीच्या पत्नीशी जवळीक साधून त्यांच्या मुलीची उंची वाढविण्यासाठी व्यायाम घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे येणे-जाणे सुरू केले. त्या वेळी त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला.

असा प्रकार दोन-तीन वेळा करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही बाब कोणाला सांगू नको, म्हणून तिला धमकाविले होते. त्याने फिर्यादीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध निर्माण केले. त्यातून ती घरातून पळून गेली. जाताना तिने घरातील 50 हजार रुपये रोख, 1 लाख 65 हजार रुपयांचे दागिने तसेच माहेरच्या घरातून 30 हजार रुपये तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीच्या मुलीने वडिलांना आपलाही त्याने विनयभंग केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news