बारामती : विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाई कधी?

बारामती : विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाई कधी?

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात क्रमांकाविना फिरणा-या वाहनांची संख्या वाढली आहे. अशा वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत आहे. विशेषतः ट्रक, ट्रॉली, टिपर या वाहनांतून हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. आरटीओ अधिकार्‍यांच्या वरदहस्ताने अवैध वाहतुकीतही वाढली आहे. यावर नियंत्रण कधी येणार, असा सवाल विचारला जात आहे.

अवैध वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने बारामती तालुक्यात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रस्त्यावर धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरू असून, यातून एखाद्याचा जीव गेल्यानंतरच आरटीओ अधिकारी जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य मार्गावर वाहनांचा क्रमांक न टाकताच वाहने जोरदार धावत आहेत. आरटीओ अधिकारी खुर्च्या सोडायला तयार नसल्याने आणि वाहनांच्या वेगावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिले नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारामती तालुक्यात विनाक्रमांकाची वाहने, ट्रीपल सीट प्रवास, कागदपत्रे नसताना प्रवास, वाहन परवाना नसणे, वीमा नसणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, विद्यार्थ्यांकडून दुचाकीचा वापर, वाहनांवर लावलेले प्रखर दिवे, रेडियम नसणे, कर्णकर्कश हॉर्न, फॅन्सी नंबरप्लेट यावर कारवाईची मागणी होत आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणार्‍या साहित्याची वाहतूक करणारी वाहने यात आघाडीवर आहेत. रस्त्यावर प्रवास करताना भरधाव वेगाने ही वाहने धावत असतात, त्यामुळे दुचाकी आणि छोटे वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

अगोदरच कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने सर्वच रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी आहे. गत महिन्यात ठराविक ठिकाणी रस्ता सुरक्षा सप्ताह घेत अधिकार्‍यांनी वरिष्ठांना काम दाखवले. मात्र, यातून ना वाहनचालकांमध्ये काहीही परिवर्तन झाले नाही. रस्ता सुरक्षा सप्ताह पुरतेच वाहतुकीचे नियम पाळायचे का, असा सवाल होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news