Amit Shah, Sharad Pawar
शरद पवारांची सत्ता आली की मराठा आरक्षण जाते; अमित शाहंचा टोला Pudhari Photo

शरद पवारांची सत्ता आली की मराठा आरक्षण जाते

केंद्रीय मंत्री अमित शहांचा टाेला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठींबा आहे. मराठा आरक्षण हव असेल तर भाजपला सत्तेत आणा. भाजपाच्या काळात मराठा आरक्षण मिळाले; पण शरद पवार यांचे सरकार आले की मराठा आरक्षण जाते, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांनी लगावला. पुणे येथे भाजपच्या महाअधिवेशनात ते बोलत होते.

काय म्हणाले अमित शहा?

Summary
  • मराठा आरक्षणला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठींबा

  • १० वर्षात शरद पवार यांनी काय केले?

  • उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष

  • केवळ भाजपच गरिबांचे कल्याण करु शकते.

शरद पवारांनी १० वर्षात काय केले?

या वेळी अमित शहा म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात देशाला खूप काही दिले आहे. शरद पवार यांनी देशाला १० वर्षांत काय दिले? १० वर्षात शरद पवार यांनी काय केले याचा हिशोब द्यावा. शरद पवार यांना दहा वर्षांत जी विकास कामे करता आली नाहीत ती नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षात केली."

 Amit Shah, Sharad Pawar
‘लाडकी बहीण’ योजनेची शाश्वती नाही : शरद पवार

शरद पवार भ्रष्टाचारांचे सरदार

"शरद पवार हे भारतातील भ्रष्टाचारांचे सरदार आहेत. देशात शरद पवार यांनी भ्रष्टाचार रुजवला. त्याचबरोबर भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरुप देण्याचे काम शरद पवार यांनी केले, अशी घणाघाती टीकाही त्‍यांनी केली.

 Amit Shah, Sharad Pawar
Rohit Pawar Tweet : ‘चुनचून के’ मारण्याची धमकी देणारे गेले कुठे? रोहीत पवारांचे खोचक ट्विट

नरेंद्र मोदींचा मराठा आरक्षणाला पाठींबा

मराठा आरक्षणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठींबा आहे. मराठा आरक्षण हवं असेल तर भाजपला सत्तेत आणा. नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाला बळ देण्याचे काम केले, भाजपाच्या काळात मराठा आरक्षण मिळाले. भाजपची सत्ता असेल तेव्हा मराठा आरक्षण असते मात्र शरद पवार यांचे सरकार आले की मराठा आरक्षण जाते, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

राहुल गांधी यांचा पराभव झाला आहे तरी त्यांना अहंकार आहे; पण आम्‍ही त्यांचा अहंकार काढू. देशातील गरीबांच्या कल्याणाचे काम कॉंग्रेस करु शकत नाही, तर देशात भाजपच गरीबांचे कल्याण करु शकते, असेही शहा म्हणाले.

 Amit Shah, Sharad Pawar
Supriya Sule on Sunil Shelke | अजित पवार, शरद पवारांसमोर सुप्रिया सुळे - सुनिल शेळकेंमध्ये बाचाबाची

महाविकास आघाडी औरंगजेब फॅन क्लब

महाराष्ट्रात भाजपने अनेक योजना पूर्ण केल्या. मोदी सरकारने देशाला सुरुक्षा दिली. दहशतवादाला आळा नरेंद्र मोदींनी घातला. जी वचन दिली ती आम्ही पूर्ण केली. महाविकास आघाडी औरंगजेब फॅन क्लब आहे, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, अशी बाेचरी टीकाही अमित शहा यांनी केली.

logo
Pudhari News
pudhari.news