अतिरेकी पळून जाऊ नये यासाठी त्यांनी संपूर्ण मंदिराला घेरले. ही खबर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयास मिळाली आणि पोलिस आयुक्त विनायक चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यात बाँब शोध पथक, श्वानपथक, दंगल नियंत्रण पथक तसेच शीघ्रकृती दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा ताफा, रुग्णवाहिका, पोलिस व्हॅन, अग्निशामक दलाचे दोन बंब सायरन वाजवत गावात आल्याने आणि मंदिरात अतिरेकी घुसले असल्याचे समजल्याने संपूर्ण देहूगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.