यापूर्वी विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्या अजिबात पाळल्या गेलेल्या नाहीत. हिवाळी अधिवेशनापूर्वी हे विमानतळ सुरू होणार असे वाटत होते. मात्र, तसे न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये निराशा वाढली आहे. आता तर प्रशासन उद्घाटनाबाबत चिडीचुप आहे, तारीख, पाहुण्यांचे नाव काहीही सांगत नाही. प्रशासनाने असे न करता प्रवाशांसाठी लवकरात लवकर हे टर्मिनल सुरू करावे.
– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ.
नवीन टर्मिनलचे उद्घाटन करणे का थांबविले आहे, हे आम्हाला माहिती आहे. व्हीव्हीआयपी असलेल्या लोकांच्या हस्ते उद्घाटन करून विमानतळ प्रशासन काय सुचवू इच्छित आहे. येथून जाणार्या हजारो प्रवाशांचे अपुर्या सुविधांमुळे हाल होत आहेत. आतातरी प्रशासनाने येथून प्रवास करणार्या हजारो प्रवाशांचा विचार करून नवीन टर्मिनल सुरू करण्याच्या हालचाली कराव्यात.
– अमित बागुल, सरचिटणीस, पुणे शहर जिल्हा काँग्रेस.