‘यशवंत’च्या सर्वसाधारण सभेत भाजपची भूमिका काय ?

‘यशवंत’च्या सर्वसाधारण सभेत भाजपची भूमिका काय ?

उरूळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 11 मार्च रोजी होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या भूमिकेकडे सभासदांचे लक्ष असून, सत्ताधारी भाजप संधीचे सोने करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारखाना सुरू करण्यासाठी काय निर्णय घ्यायचा हा प्रश्न आता सभासदांच्या कोर्टात पडला आहे. कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाची निवडणूक घेऊन या प्रश्नाला सामोरे जाण्याचा निर्णय घेणार का, भाडेतत्त्वावर देण्यासाठी मान्यता देणार हा सभासदांचा निर्णय महत्त्वाचा आहे. या सभेत भागभांडवल उभारणीसाठी इतर काय तरतूद करता येईल, यावरही चर्चा होणार आहे.

केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत मडबल इंजिनफ सरकार आहे. नुकतेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना चालू करण्यासाठी थेट सरकार आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचधर्तीवर शेजारील दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना सरकारच्या मदतीने सुरू केला आहे. यासाठी भाजपचे आमदार राहुल कुल यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. सत्ताधारी भाजपकडून हवेलीतही असे प्रयत्न होतील काय म्हणून सभासदांना अपेक्षा आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news