Western Ghats Biodiversity Decline: पश्चिम घाटात जैवविविधतेत 35 टक्के घट; कीटक प्रजातींवर गंभीर संकट

ड्रॅगनफ्लाय व डॅमसेल्फ्लाय प्रजातींच्या घटलेल्या नोंदींमुळे पर्यावरणीय ऱ्हासाचे धोकादायक संकेत
Dragon Fiy
Dragon FiyPudhari
Published on
Updated on

पुणे: पश्चिम घाटात करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणातून या प्रदेशातील जैवविविधतेबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. संशोधकांना या काळात ऐतिहासिक नोंदीनुसार असलेल्या एकूण ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) प्रजातींपैकी फक्त 65 टक्के प्रजातींची नोंदणी करता आली. पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कीटकांच्या ज्ञात विविधतेमध्ये जवळपास 35 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे.

Dragon Fiy
Pune Investment Fraud Scam: पुण्यात 43 कोटींचा घोटाळा; व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक फरार

फेबुवारी 2021 ते मार्च 2023 या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये पाच राज्यांमधील 144 ठिकाणांवरील ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) यांसारख्या कीटकांचा गट ओडोनाटा प्रजातींचे मॅपिंग करण्यात आले. एमआयटी-डब्ल्यूपीयूचे प्रा. डॉ. पंकज कोपर्डे, पीएचडी स्कॉलर अराजुश पायरा, विद्यार्थी अमेय देशपांडे आणि सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज, केरळचा रेजी चंद्रन या संशोधन टीमने गोड्या पाण्यातील अधिवासांमध्ये संशोधनाचे काम केले.

Dragon Fiy
Pune Water Supply Crisis: पुण्यात पाणीपुरवठा गोंधळ; सभेत प्रशासनावर नगरसेवकांची तीव्र टीका

ओडोनाटा हे पर्यावरणातील बदलांबाबत अत्यंत संवेदनशील असतात. कारण, त्यांचे पुनरुत्पादन पूर्णपणे गोड्या पाण्यातील परिसंस्थेवर अवलंबून असते. परिणामी, त्यांना ‌’इंडिकेटर टॅक्सा‌’ (पर्यावरणीय सूचक) मानले जाते. म्हणजे, त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती प्रत्यक्ष जलीय स्रोतांच्या पर्यावरणीय आरोग्याला निदर्शनास आणते. नोंद करण्यात आलेल्या प्रजातींची संवर्धनाची स्थिती देखील चिंतेत भर घालणारी आहे. एलाटोनेउरा सौटेरी, प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा आणि सायक्लोगॉम्फस यप्सिलॉन या तीन प्रजाती सध्या ‌’असुरक्षित‌’ म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. पण, सर्वेक्षणात आढळलेल्या बहुतेक प्रजाती आययूसीएन रेड-लिस्ट ऑफ थेटन स्पेसीजमध्ये ‌’माहितीचा अभाव‌’ आणि ‌’मूल्यांकन न झालेली‌’ या श्रेणीत येतात. ज्यामधून या विषयासंदर्भात वैज्ञानिक ज्ञानाची मोठी कमतरता दिसून येत आहे.

Dragon Fiy
Pune Water Supply Update: पुण्यात पाणीपुरवठा सुरळीत; मुख्य जलवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण

महाराष्ट्रात 100 प्रजातींची नोंद

या संशोधनामध्ये सर्वाधिक 105 ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आलेल्या महाराष्ट्रात 100 प्रजातींची नोंद झाली, ज्यामध्ये 12 वैशिष्ट्‌‍यपूर्ण प्रजातींचा समावेश आहे. केरळमध्ये 14 ठिकाणी नमुने घेतले आहेत, जेथे वैशिष्ट्‌‍यपूर्ण जैवविविधतेची उच्च एकाग््राता दिसून आली. तिथे आढळलेल्या 83 प्रजातींपैकी 33 प्रजाती वैशिष्ट्‌‍यपूर्ण होत्या. कर्नाटकमध्ये (17 ठिकाणे) 64 प्रजाती आणि 6 वैशिष्ट्‌‍यपूर्ण प्रजातींची नोंद झाली. गोव्यामध्ये (3 ठिकाणे) 35 प्रजातींसह 4 वैशिष्ट्‌‍यपूर्ण प्रजातींची नोंद झाली, तर गुजरातमध्ये (5 ठिकाणे) 18 प्रजाती आढळल्या; पण तिथे एकही वैशिष्ट्‌‍यपूर्ण प्रजाती दिसून आली नाही.

Dragon Fiy
Pune Water Supply Disruption: पुण्यात पाणीटंचाई; फ्लो मीटर विलंबामुळे दुसऱ्या दिवशीही नळ कोरडे

हे संशोधन पश्चिम घाटातील ओडोनाटाच्या आजवरच्या सर्वांत व्यापक सर्वेक्षणांपैकी एक आहे. आमचे सर्वेक्षण घाटातील ज्ञात ओडोनाटा प्रजातींपैकी फक्त 65 टक्के प्रजाती शोधू शकले, ज्यामधून प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाचा संभाव्य ऱ्हास निदर्शनास येतो. त्यामुळे या संशोधनाद्वारे ओडोनाटा-समृद्ध क्षेत्रांना संवर्धनासाठी प्राधान्य देण्याची अत्यंत गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. पंकज कोपर्डे, सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी-डब्ल्यूपीयू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news