भोर येथील शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे स्वागत

भोर येथील शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे स्वागत
Published on
Updated on

बाजारवाडी; पुढारी वृत्तसेवा : पानिपत येथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजदंड हाती घेऊन सिंहासनावर बसलेली मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. ही मुर्ती पुणे येथे तयार करण्यात आली आहे. दरम्यान ही मुर्ती पानिपतकडे घेऊन जात असताना सोमवारी (दि. २०) भोर शहरात मुर्तीचे आगमन होताच येथील चौपाटी येथे मुर्तीचे पुजन करुन फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.

हरियाणा राज्यातील पानीपतस्थित आपल्या रोड मराठा समाजविषयीची नाळ घट्ट करण्याचे राज्यातील मराठा समाजाने ठरवले. त्यानुसार समस्त मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावरील मूर्ती शिल्पकार दीपक थोपटे यांच्याकडून बनवुन घेतली. यासाठी भोरमधील मराठा समाजासह इतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या. सोबत शिवकार्यासाठी तळमळीने अविरत कार्य करणारे शेकडो शिवभक्त पुढे आले.

अशा या महाराजांच्या मूर्तीचे शहरात आगमन होताच त्याचे स्वागत करुन मूर्ती पानिपतकडे रवाना झाली. २६ सप्टेंबर रोजी भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत पानिपत येथे मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news