पुणे : संवेदनशील मतदान केंद्रांची वेबकास्टिंग

पुणे : संवेदनशील मतदान केंद्रांची वेबकास्टिंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील आणि इतर मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात एकूण मतदान केंद्रांच्या दहा टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर वेब कास्टिंगद्वारे (थेट प्रक्षेपण) लक्ष ठेवले जाणार आहे. ज्या मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडलेला असेल, अशा केंद्रांना संवेदनशील आणि अतिसंवेदनशील म्हणून गणले जाते. कसब्यात 76 ठिकाणी 270 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यातील 9 केंद्र संवेदनशील आहेत.

तर चिंचवडमध्ये 87 ठिकाणी असलेल्या 510 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यातील 13 केंद्र ही संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच एकूण मतदान केंद्रांच्या दहा टक्के म्हणजेच कसब्यात 27, तर चिंचवडमध्ये 51 मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची वेबकास्टिंग केली जाणार आहे.

अशी होणार मतमोजणी
कसबा पेठेची मतमोजणी ही कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम गोदामात येथे होणार आहे. त्यात एकूण 14 टेबलवर 20 फेर्‍यांत मतमोजणी होईल. चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे होणार असून, येथेही 14 टेबल असणार आहेत. मात्र, 37 फेर्‍या होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news