

Weather Update
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सावट अजून तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि कोकणच्या काही भागात वादळीवारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडणार आहे.
दरम्यान हवामान विभागाने राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’जारी केला आहे. या पावसाचे सावट असल्याने उन्हाचा आणि उकाड्याचा तडाखा कमी झाला आहे. मागील आठवड्यापर्यत उन्हाचा तडाख्यामुळे अगदी ४५ अंशापर्यत किमान तापमानाचा पारा पोहचला होता. तो आता ४० अंशावर आला आहे. बुधवारी अकोला शहराचे तापमान ४०.३ अंश नोंदवले गेले. हे राज्यात सर्वाधिक तापमान होते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य प्रदेश भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. तर दक्षिणपूर्व राजस्थान ते उत्तर झारखंड पार करून उत्तर पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगडपर्यत द्रोणीय स्थिती आहे. उत्तर दक्षिण भागापासून सुरू झालेली आणखी एक द्रोणीय स्थिती तेलंगणापासून गल्फ ऑफ मनारपर्यत पोहचली आहे. ( रॉयल सीमा व तामिळनाडू पार करून ) सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तर अरबी समुद्र ते पश्चिम मध्य प्रदेश पार करून गुजरातपर्यत आणखी एक द्रोणीय स्थिती सध्या कार्यरत आहे. या सर्व परिणामामुळे राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. कोकणात या पावसाचे प्रमाण कमी असले तरी विदर्भात मात्र राज्याच्या इतर विभागाच्या मानाने अवकाळी पाऊस जास्त राहील. त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस चांगलाच बरसणार आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट माथा,कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती,बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, यवतमाळ