Weather Update | पारा घसरला : राज्यातील या जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

Weather warning
Weather warning

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोमवारी बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते. त्यामुळे कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाल्याने राज्याचा सरासरी पारा 35 अंशांपर्यंत खाली आला होता. दरम्यान, 16 मेपर्यंत राज्यात सर्वत्र 'यलो अलर्ट'चा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वार्‍यांची द्रोणीय रेषा कर्नाटक ते वायव्य मध्य प्रदेशापर्यंत जात आहे. ही रेषा मध्य महाराष्ट्रातून जात आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहत गारपीटही झाली. त्यामुळे सरासरी कमाल तापमानात 4 ते 5 अंंशांनी घट झाली होती.

राज्याचे सोमवारचे कमाल तापमान

अमरावती 41.8, पुणे 31.4, अहमदनगर 38.8, जळगाव 40.5, कोल्हापूर 33.7, महाबळेश्वर 27.6, मालेगाव 38.8, नाशिक 34.1, सांगली 34.9, सातारा 33.4, सोलापूर 37.4, छत्रपती संभाजीनगर 35.6, धाराशिव 38.2, परभणी 38.1, नांदेड 39.2, बीड 38.2, अकोला 40.1, अमरावती 41.8, बुलडाणा 34, चंद्रपूर 40, गोंदिया 38.8, नागपूर 38.2, वाशिम 41.6, वर्धा 40, यवतमाळ 40.5.

'यलो अलर्ट'

  • कोकण : 15 मेपर्यंत
  • मध्य महाराष्ट्र : 16 मेपर्यंत
  • मराठवाडा : 17 मेपर्यंत
  • विदर्भ : 17 मेपर्यंत

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news