Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी होणार कमी दाबाने पुरवठा; देखभाल दुरुस्तीची केली जाणार कामे
Water Cut
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंदPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या गुरुवारी (दि.18) शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे, तर शुक्रवार (दि. 19) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. शहरातील जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रअंतर्गत पर्वती एचएलआर टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. 1 व 2, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एसएनडीटी, एच.एल.आर. टाकी परिसर.  (Latest Pune News)

Water Cut
Pune Market Committee News: बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या मानधनात वाढ; दैनिक भत्ता, बैठक भत्ता दरही वाढविल्याने दिलासा

चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब, जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्रालगत जीएसआर टाकी परिसर, गणपती माथा व वारजे माळवाडी जलकेंद्र, एसएनडीटी (एच.एल.आर.) परिसर, होळकर जलकेंद्र, येथील विद्युत/ पंपिंगविषयक व वितरण व्यवस्था स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news