Pune Water Crisis: पाणीकपातीचा निर्णय मागे घेऊनही दक्षिण पुण्यातील पाणीबाणी कायम

समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्या रिकाम्याच
Pune News
पाणीकपातीचा निर्णय मागे घेऊनही दक्षिण पुण्यातील पाणीबाणी कायम Pudhari
Published on
Updated on

पुणे: पाणीकपातीचा निर्णय मागे घेऊनही दक्षिण पुण्यातील पाणीबाणी कायम आहे. काही भागांत अपुरा पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत दक्षिण पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी 12 टाक्या उभारण्यात येणार असून, यातील दोनच टाक्या कार्यान्वित असल्याने या परिसरातील राहिवाशांना नियमितपणे पाणी मिळत नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी मान्य केले आहे.

धरणात पुरेसा पाणीसाठा असतानादेखील गेल्या आठवड्यात दक्षिण पुण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचा निर्णय घेत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली होती. या निर्णयावर नागरिकांनी व विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. (Latest Pune News)

Pune News
Rajiv Gandhi Zoo: वातावरण थंड अन् प्राण्यांचे कुलर बंद

फक्त दक्षिण पुण्यावरच अन्याय का, असा सवाल नागरिकांनी केला होता. नागरिकांचे संताप लक्षात घेऊन दक्षिण पुण्यावरील पाणीकपात रद्दची घोषणा करण्यात आली असली, तरी अद्यापही या भागातील काही परिसरात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

कात्रज-कोंढवा रस्ता भागात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यासह सुखसागर, गोकूळनगर, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर, साईनगर, कात्रज, संतोषनगर या भागांतदेखील पाणीपुरवठा अनियमित होत आहे. उंच-सखल भाग असे कारण देत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दक्षिण भागातील पाणीप्रश्न हा आजही कायम आहे. येथील लोकसंख्येच्या तुलनेत जलवाहिन्यांचे जाळे कमी असल्याने नागरिकांना रोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे कात्रज-कोंढवा भागात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

Pune News
Drainage Cleaning Fraud: पुण्यात ड्रेनेज सफाईचा केवळ दिखावा! कोट्यवधीची रक्कम पुन्हा वाया

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत 65 टाक्या उभारण्यात येणार असून, यातील 11 ते 12 टाक्यांचे काम राहिले आहे. कोंढवा येथे काही कामे सुरू असून, ती कामे पूर्ण झाल्यावर या टाक्यांचे काम होऊन त्यांना नियमित पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त नंदकिशोर जगताप यांनी सांगितले. दरम्यान, कोंढवा वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून कात्रज पंपिंग स्टेशनद्वारे केदारेश्वर, महादेवनगर, आगम मंदिर अशा तीन पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. मात्र, या भागाला मिळणार्‍या पाणीसाठ्यापैकीकमी पाणी मिळते.

कात्रज-कोंढवा भागाला दररोज 165 एमएलडी पाणीपुरवठा

दक्षिण पुण्यातील कात्रज-कोंढवा भागाला रोज 165 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वडगाव जलकेंद्रातून हा पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी कात्रज, कोंढवा, सिंहगड, धनकवडी, येवलेवाडी व बिबवेवाडीच्या काही भागांत दिले जाते. मात्र, या भागातील लोकसंख्या जास्त असल्याने या पाण्याचा समान पाणीपुरवठा व्हावा, यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत 65 टाक्या उभारल्या जाणार आहेत. दक्षिण पुण्यात 11 ते 12 टाक्या बांधल्या जाणार आहेत. यतील काही टक्यांचे काम झाले आहे. मात्र, काही टाक्यांचे काम हे राहिले आहेत. काही ठिकाणी भूसंपदनाचा विषय आहे. हा विषय लवकरच मार्गी लावला जाईल. सध्या दक्षिण पुण्याला 250 एमएलडी पाणी पुरवले जाते. कोंढवा येथील काही कामे झाल्यास येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल.

- नंदकिशोर जगताप, उपायुक्त पाणीपुरवठा विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news