पुणे : शहरात पाण्याचे डोह; पालिकेकडे चारच तक्रारी

पुणे : शहरात पाण्याचे डोह; पालिकेकडे चारच तक्रारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, मात्र, महापालिकेच्या अपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे केवळ चार तक्रारी नोंद झाल्या आहेत. शहर व परिसरात दमदार हजेरी लावली.

या पावसामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक केली. मुख्य शहरातील टिळक रस्ता, सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, केळकर रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सायंकाळपर्यंत केवळ चार तक्रारींची नोंद झाली होती. यामध्ये साळुंखे विहार येथे सोसायटीच्या परिसरात पाणी साचले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news