Jayant Narlikar: ती नारळीकर सरांची-माझी शेवटचीच भेट ठरली...वॉचमनने सांगितल्या आठवणी

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमच्या खगोल अपार्टमेंटमध्ये खूप गर्दी झाली होती.
Jayant Narlikar
ती नारळीकर सरांची-माझी शेवटचीच भेट ठरली...वॉचमनने सांगितल्या आठवणीPudhari News Network
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे: नारळीकर सर खूप साधे होते. दररोज ते अपार्टमेंटमध्ये फिरायला येत असत. इथून जवळच असलेल्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेत (आयसर) ते सायंकाळी लेकीसोबत फिरायला गेले होते. तेव्हा फिरायला जाताना मी त्यांना त्यांच्या वॅगनर गाडीत बसवले, सोबत त्यांची मधवी मुलगी होती. ती त्यांची-माझी शेवटचीच भेट ठरली... ही आठवण सांगत होते डॉ. जयंत नारळीकर यांच्या पाषाण भागातील इमारतीतील वॉचमन ज्ञानेश्वर सणस. त्या आठवणी त्यांच्याच शब्दांत...

डॉ. नारळीकर हे 2003 मध्ये आयुकातून निवृत्त झाले. या पाषाण भागातील सी-मॅट संस्थेसमोर असलेल्या खगोल नावाच्या अपार्टमेंटमध्ये ते राहावयास आले. ही इमारत खगोलशास्त्रज्ञांसाठी बांधली आहे. येथे ते गत 24 वर्षांपासून राहत होते. (Latest Pune News)

Jayant Narlikar
Ravindra Dhangekar: शिंदेंनी सोपवली रवींद्र धंगेकरांवर मोठी जबाबदारी; पुणे महानगरप्रमुखपदी नियुक्ती

तीनही मुली विदेशात राहत असल्याने त्यांच्याजवळ एक केअरटेकर, घरात स्वयंपाक करायला येणारा स्वयंपाकी इतकेच राहत असत. मोठी मुलगी गीता आणि मधली मुलगी गिरिजा या दोघी अमेरिकेत आहेत, तर लहान मुलगी लीलावती जर्मनीत असतात. लीलावती मॅडम नुकत्याच पुण्यात वडिलांच्या भेटीला येऊन परत जर्मनीला गेल्या.

तसेच गिरिजाताईदेखील अमेरिकेतून वडिलांची प्रकृती पाहण्यास आल्या होत्या, त्याच शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ होत्या. त्यांनी काल म्हणजे सोमवारी वडिलांना त्यांच्या वॅगनर कारमध्ये राष्ट्रीय विज्ञान संस्थेत फिरावयास नेले, तेव्हा सर प्रसन्न वाटले. मीच त्यांना गाडीत बसताना मदत केली. पण, ही त्यांची शेवटची भेट ठरली. आज सकाळीच अपार्टमेंटमध्ये जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स त्यांचे पार्थिव घ्यायला आली तेव्हाच आम्हाला सर पहाटे गेल्याचे समजले.

Jayant Narlikar
Pune: महापालिकेच्या मेडिकल कॉलेजची मान्यता धोक्यात

काही दिवसांपूर्वी सर पायरीवरून घसरून पडल्याने त्यांच्या खुब्याला मार लागला. त्यामुळे त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्याला आठ ते दहा दिवस होऊन गेले. मात्र, तेव्हापासून सरांना खूप थकवा जाणवत होता. त्यांच्या हृदयाचे ठोके कमी होत असल्याचे डॉक्टर सांगत होते. सर खूप साधे होते.

जगात त्यांची कीर्ती होती. त्यांना भेटायला खूप शास्त्रज्ञ या इमारतीत येऊन गेले. ते साधी वॅगनर गाडी वापरत असत. ड्रायव्हर त्यांना फिरायला घेऊन जात असे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमच्या खगोल अपार्टमेंटमध्ये खूप गर्दी झाली होती. पण, त्यांचे पार्थिव रुग्णालयात ठेवले आहे, असे सांगितल्यावर गर्दी कमी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news