

पुणे: शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख म्हणून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेनेत नवीन पद निर्माण केले असून, त्यांच्या माध्यमातून पुण्यात शिवसेनेची ताकद वाढविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. सेनेत त्यांना विधानपरिषदेवर अथवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद, अशी महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धंगेकर यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी टाकली आहे. (Latest Pune News)