

शनिवारी, रविवारी प्रवासी संख्या कमी असल्याने इतर दिवसांपेक्षा कमी बस गाड्या सोडल्या जातात. या वेळी साधारणत: 1700 बस मार्गांवर असतात. नुकत्याच 262 बस स्क्रॅप केल्या आहेत. मात्र, त्याला पर्याय म्हणून खात्याकडील बंद असलेल्या सुमारे 100 पेक्षा अधिक बस दुरुस्त करून मार्गावर उतरवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना बसची कमतरता भासणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मेट्रो फीडरसाठी 19 बस देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा इतर वाहतुकीवर परिणाम होत नाही. तसेच, प्रवाशांकरिता बस थांबे बसवण्यात येत आहेत.– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.
हेही वाचा