

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्याने तपासण्यांना विलंब होत आहे. सीटी स्कॅन, एमआरआय तपासण्यांसाठी दोन-तीन आठवड्यांचे वेटिंग असून, रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. सध्या रुग्णालयात दोनच एमआरआय मशिन असून, मशिनची संख्या वाढविल्यास रुग्णांची ससेहोलपट थांबणार आहे. ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधूनही गरीब आणि गरजू रुग्ण उपचारांसाठी येतात.
एकीकडे खासगी आरोग्यसेवा महागडी झालेली असताना ससून रुग्णालयात मोफत उपचार मिळतील, अशी रुग्णांची अपेक्षा असते. मात्र, रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य सुविधा वेगाने वाढत नसल्याने उपचारांमध्ये दिरंगाई होत आहे. सोनोग्राफी, एक्स-रे अशा तपासण्यांसाठी दोन दिवस तर सीटी स्कॅन, एमआरआय अशा तपासण्यांसाठी दोन-तीन आठवड्यांचे वेटिंग आहे, अशी तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.
सरासरी दोन-तीन आठवड्यांचे वेटिंग असून, रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे तातडीच्या रुग्णांना सीटी स्कॅन, एमआरआय तपासण्यांमध्ये प्राधान्य दिले जाते. रुग्णांना जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागू नये, म्हणून नियोजन सुरू आहे.
– डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय
हेही वाचा