वडगावातील भिंती झाल्या ‘बोलक्या’

Wadgaon walls become 'talking'
Wadgaon walls become 'talking'
Published on
Updated on

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : वडगाव नगरपंचायतच्या वतीने 'माझी वसुंधरा' अभियान हे प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत पर्यावरणाचा संदेश देणारी बोलकी चित्रे शहरातील भिंतींवर काढण्यात येत असल्याने या बोलक्या भिंती आकर्षण ठरू लागल्या आहेत.

नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष शारदा ढोरे, मुख्याधिकारी जयश्री काटकर, आरोग्य समिती सभापती राहुल ढोरे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहरात माझी वसुंधरा अभियान विविध उपक्रमांनी राबविले जात आहे आहे.

यामध्ये पाचही घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून नागरिकांमध्ये त्याची जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
अभियानाचा महत्वाचा भाग असलेल्या ई प्लेज, इलेक्ट्रॉनिक वाहने वापरण्यास प्राधान्य देणे,

हवा गुणवत्ता तपासणी, उत्कृष्ट सफाई कर्मचारी पुरस्कार व प्रशिक्षण, पथनाट्य शिबीर, स्वच्छता जनजागृती मोहीम आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

त्यासोबतच शहरात इलेक्ट्रीक गाडी चार्जिंग स्टेशन, एक घर, एक झाड या संकल्पनेतून वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक आठवडया करीता मोकळया जागा नियोजित करण्यात येत असून सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी, स्थानिक सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी संघटना, महिला बचत गट, शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्ग यांना सोबत घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

पर्यावरण पुरक इमारतींची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्यात येणार आहे, सार्वजनिक भिंतीवर स्वच्छतेचे सुंदर संदेश व माझी वसुंधरा अभियानाच्या घटकांची माहिती देणारी चित्रे रेखाटण्यात येत आहेत.

अत्यंत आकर्षक पद्धतीने रेखाटण्यात आलेली ही चित्रे पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदुषण रोखा, पर्यावरणाचे समतोल राखा इत्यादी संदेशावर आधारीत आहेत.

या संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना माझी वसुंधरा अभियानातील अनेक घटकांची सचित्र माहिती मिळणार आहे. अलिकडच्या काळात फ्लेक्सच्या वाढत्या वापराला निर्बंध घालण्यासाठी नगरपंचायतचे हे महत्वपूर्ण पाऊल असून यापुढे फ्लेक्सचा वाढता वापर कमी करणे हे या बोलक्या भिंती उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, उपनगराध्यक्ष शारदा ढोरे, आरोग्य सभापती राहुल ढोरे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news