पुणे : तांत्रिक बिघाड असलेली मतदानयंत्रे पाठवली परत

पुणे : तांत्रिक बिघाड असलेली मतदानयंत्रे पाठवली परत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकांसाठी 1 हजार 720 मतदानयंत्रे प्राप्त झाली होती. या यंत्रांचे प्रत्यक्ष मतदान घेऊन यशस्वी प्रात्यक्षिक (मॉक पोल) जिल्हा निवडणूक शाखेकडून घेण्यात आले. यात तांत्रिक बिघाड असलेली यंत्रे पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परत पाठवून देण्यात आली आहेत.  आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. मंगळवारी (31 जानेवारी) निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली.

जिल्हा निवडणूक शाखेकडून रविवारी (29 जानेवारी) मतदानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्याकरिता नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले होते. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले, अशी माहिती उपजिल्हा  निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पुण्यात एकूण 1720 मतदानयंत्रे देण्यात आली होती. त्यामध्ये बॅलेट युनिट, कण्ट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट या यंत्रांचा समावेश होता. मतदान प्रात्यक्षिकानंतर यांपैकी 1664 बॅलेट युनिट, 1617 कण्ट्रोल युनिट आणि 1620 व्हीव्हीपॅट यंत्रे सुस्थितीत आहेत. तर, 54 बॅलेट युनिट, 97 कण्ट्रोल युनिट आणि 94 व्हीव्हीपॅट यंत्रांत तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही यंत्रे परत पाठविण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news