

पुणे: पीएमपीच्या स्वमालकीच्या 98 बसगाड्यांमध्ये ‘व्हेईकल लाईव्ह ट्रॅकिंग डिव्हाईस’ (व्हीएलटीडी) बसवण्यात येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच 2019 नंतर खरेदी केलेल्या बसगाड्यांना हे उपकरण बसवण्याचे काम सुरू होईल, यासंदर्भातील काम पीएमपीकडील आयटी विभागाकडून सुरू आहे. असे पीएमपीचे मुख्य अभियंता राजेश कुदळे यांनी सांगितले.
महत्वाचे मुद्दे :-
पीएमपीच्या 98 स्वमालकीच्या बसगाड्यांमध्ये बसणार ‘व्हीएलटीडी’
'व्हीएलटीडी' बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू
2019 नंतर खरेदी केलेल्या बसगाड्यांना प्राधान्याने हे उपकरण बसवले जाणार
खासगी आणि सार्वजनिक वाहतूकीच्या प्रवासी वाहनांना ‘व्हीएलटीडी’ बंधनकारक करण्यात आले आहे.
या प्रणालीमुळे बसचे थेट ठिकाण (लाईव्ह लोकेशन) प्रवाशांना आणि प्रशासनाला समजेल. (latest pune news)
प्रवाशांना होणारा फायदा:-
‘व्हीएलटीडी’मुळे बसचे थेट ठिकाण प्रशासनाला कळते. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन स्थितीत, जसे की अपघात किंवा इतर कोणतीही अडचण आल्यास, बसचा शोध घेणे आणि तातडीने मदत पुरवणे शक्य होते. यामुळे प्रवाशांची सुरक्षा अधिक सुनिश्चित होते.