विस्ट्रा आयटीसीएल, एचडीएफसीचे कर्ज कधीच घेतले नाही : संजय काकडे

विस्ट्रा आयटीसीएल, एचडीएफसीचे कर्ज कधीच घेतले नाही : संजय काकडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड आणि एचडीएफसीचे कर्ज घेतल्यासंबंधीच्या बातम्या चुकीच्या आहेत. विस्ट्रा आयटीसीएल आणि एचडीएफसी हे आमचे इक्विटी पार्टनर (भागीदार) आहेत. या दोन्ही फर्मकडून मी अथवा माझ्या कंपनीने कोणत्याही प्रकारचे कर्ज कधीच घेतलेले नाही, अशी माहिती संजय काकडे ग्रुपचे प्रमुख संजय काकडे यांनी दिली.

विस्ट्रा आयटीसीएल आणि एचडीएफसी हे इक्विटी पार्टनर असल्याने त्यांच्या भागीदारीचे समभाग म्हणजेच शेअर्स विकण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही बाब समजून घेतली पाहिजे. त्यामुळे मी 786 कोटी आणि 133 कोटी कर्ज बुडवल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये, असेही काकडे यांनी सांगितले.

समभाग विकल्यानंतर ते खरेदी करणारे पार्टनर होतील. यामध्ये कंपनी दिवाळखोरी निघत नसते केवळ तुमचा भागीदार बदलतो. विस्ट्रा आयटीसीएल आणि एचडीएफसी हे भागीदार असल्याने त्यांना त्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स विकण्याचा अधिकार आहे. ते शेअर्स दुसरे कोणी तरी खरेदी करतील आणि पार्टनर होतील, असे काकडे म्हणाले. निवडणूक जवळ येऊ लागली की अशा प्रकारच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या पसरवल्या जातात असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news