

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्री खंडोबा देवाला गुरुवारी (दि. 4) पहाटे नित्य पूजेवेळी भाविकांच्या वतीने द्राक्षांची आरास करण्यात आली. वर्षभरात विविध हंगामांत खंडोबा देवाला बिल्वपूजा, गंधपूजा, भातपूजा, भंडारपूजा, धान्यपूजा, दवनापूजा, फळे आणि पुष्पपूजा अशा सप्तपूजा करण्यात येतात.
गुरुवारी पहाटेदेखील मातेरेवाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील भाविक गोरख रमेश शेळके व खडकजाम येथील शरद नामदेव उशीर यांच्या वतीने खंडोबा देवाला द्राक्षांची आरास करून पूजा बांधण्यात आली. या वेळी पुजारी चेतन सातभाई, नितीन बारभाई, नित्य सेवेकरी व श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, माऊली खोमणे, सोमनाथ उबाळे उपस्थित होते.