

बावडा : इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामातील हरभरा पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी ऊस पिकात आंतरपीक म्हणून घेतलेले हरभरा पीक जोमदार आले आहे. हरभरा हे द्विदल वर्गातील पीक आहे. परिणामी, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी या पिकाची मदत होते, त्यामुळे उपलब्ध क्षेत्रावर हरभर्याचे पीक घेण्याकडे शेतकर्यांचा कल आहे.
घाटे पोखरणार्या अळीचा वेळेवर बंदोबस्त केल्यास हरभरा पिकापासून शेतकर्यांना चांगली आर्थिक प्राप्ती होते असा अनुभव आहे. तसेच हरभर्यास बाजारामध्ये चांगला भाव मिळत आहे. ऊस पिकामध्ये हरभर्याचे आंतरपीक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकरी विजयसिंह कानगुडे (शेटफळ हवेली), अनिल जाधव (रेडणी), शरद जगदाळे पाटील (तणू), दीपक गुळवे (काटी) यांनी सांगितले.