Opration Sindur : पुण्यात 'मिशन सिंदूर' चा विजयोत्सव; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती

कसब्याचे आमदार आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची आरती करण्यात आली
Pune news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरतीPudhai
Published on
Updated on

Mission Sindur Success Celebration

पुणे : वंदे मातरम..., भारत माता की जय..., नरेंद्र मोदी यांचा विजय असो असा घोषणा देत मिशन सिंदूरचा जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानमध्ये घुसून घेतलेला बदला हे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक आहे. या वीर जवानांना बळ देण्यासाठी आणि ‘मिशन सिंदूर’ चा विजय उत्सव साजरा करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कसब्याचे आमदार आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची आरती करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, विशाल धनवडे, प्रमोद कोंढरे यांसह महिला पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune news
Operation Sindoor: भारताने केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल आम्ही समाधानी: संगीता गनबोटे

यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, ज्या दिवशी 27 निरपराध पर्यटकांवर अतिरकेयानी हल्ला केला. त्याच दिवशी नरेंद्र मोदी परदेशातून तर अमित शहा घटनास्थळी पोहचले त्याचदिवशी दोघांनीही या घटनेचा निषेध करीत याचे उत्तर दिले जाईल असे सांगितले होते. संपूर्ण विश्वात मोदी साहेब भारत शांतता आणि विकसित देश म्हणून प्रगती करीत असताना आशा पद्धतीने कोणी वाकड्या नजरेने पाहत असतील तर नकीच असा पद्धतीने उत्तर दिले जाईल. ज्या 27 पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांना मोदी सरकार आणि भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या नऊ स्थळांवर हल्ले करून खऱ्या अर्थाने आदरांजली दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news