गोखलेंची संस्था खोकली करणार्‍यांमध्ये रानडेंचाही सहभाग

गोखलेंची संस्था खोकली करणार्‍यांमध्ये रानडेंचाही सहभाग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सामाजिक, आर्थिक अन् अध्यात्मिक राजकारण या हेतूने स्थापन केली. मात्र, संस्थेत विद्यमान अध्यक्ष, सचिव अन् आताचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी संस्थेला आणखी खोकले करण्यास सुरुवात केली आहे. सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या अलाहाबाद शाखेत कोट्यवधी रुपयांचा शासकीय मामला मिटवण्याच्या नावावर बेहिशेबी कारभार केल्याचे पुरावे सादर करणार्‍या व्यक्तींना संस्थेतून काढणे, खोटे आरोप लावणे, कोरम नसताना ठराव पास करून घेणे, अशा असंवैधानिक घटनेला अध्यक्ष दामोदर साहू, सचिव मिलिंद देशमुख यांच्यासह आता कुलगुरू डॉ. अजित रानडे हे प्रत्यक्ष सहभागी होऊन गोखले यांच्या संस्थेला संपवत असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत.

आपला मुलगा संस्थेचा आजीवन सदस्य करण्यासाठी सचिव मिलिंद देशमुख हे अध्यक्ष दामोदर साहू यांच्या मुलाला पात्रता नसताना संस्थेत सदस्य करून घेतले. त्यावर आत्मानंद मिश्रा यांनी हरकत घेऊन न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यावेळी धर्मादाय आयुक्तांना हाताशी घेऊन प्रकरण मिटवण्यात कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी सामील करून घेत प्रकरण गुलदस्त्यात बंद केले. त्यानंतर लगेच मिलिंद देशमुख यांनी चिन्मय देशमुखला धर्मादाय आयुक्तांकडे बदलअर्ज करून संस्थेत घेण्यासाठी केस दाखल केली. मग संस्थेत वाट्टेल ते कारनामे करत संस्थेचा पैसा देशमुख यांनी वापरला.

आक्षेप घेणार्‍यांना पदावरून हटवले
अध्यक्ष दामोदर साहू यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतल्याने कुलगुरू रानडे यांना गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मोकळे रान दिले. त्यांनी प्रा. काकाली मुखोपाध्याय यांच्या अवैध कामाला पाठीशी घातले. यावर आक्षेप घेणार्‍यांना व्यवस्थापन मंडळाच्या पदावरून तत्काळ देशमुख यांनी काढून टाकले. हा सर्व घटनाक्रम अलाहाबादमधील फ—ी होल्ड मामल्यात संस्थेच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा तसेच नागपूर शाखेच्या फ—ी होल्डसाठी दीड कोटी रुपये रानडेंकडून घेण्यामागे इमले अन् मालमत्ता गडप करण्याचे नियोजन असून गोखले यांची संस्था खोकले करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे.

सर्व प्रकरणाचे सबळ पुरावे हाती आले आहेत. वेळ पडली तर न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी आहे. जेणेकरून आतापर्यंत झालेला सर्व घटनाक्रमाची पोलखोल होईल. दिवंगत रमेशचंद्र नेवे यांच्या मृत्यूनंतर मिलिंद देशमुख यांनी रानडे इन्स्टिट्यूटच्या सोळा एकर जमीन हडप केली. या प्रकरणात त्यांना शिक्षा का होत नाही. महाराष्ट्रात सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीला बचावासाठी कुणीही नाही, असेच सध्याचे चित्र आहे.
                                                                   -प्रवीणकुमार राऊत, तक्रारदार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news