Pune Aapla Davakhana: पुण्यातील सहा ‘आपला दवाखाना’ पनवेल, कोल्हापूरला हलवले; जागेअभावी पुणेकरांचे नुकसान!

पुणे महापालिकेच्या हद्दीत ५८ दवाखान्यांना मंजुरी; प्रत्यक्षात १९ सुरू, उर्वरित सहा दवाखाने दुसऱ्या शहरांकडे वर्ग करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Aapla Davakhana
Aapla DavakhanaPudhari
Published on: 
Updated on: 

विनय पुराणिक

पुणे: शहरातील नागरिकांना घराजवळ मोफत प्राथमिक आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेला पुण्यात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे खीळ बसली आहे. महापालिका क्षेत्रात मंजुरी मिळूनही जागेअभावी सुरू होऊ न शकलेले सहा दवाखाने अखेर दुसऱ्या शहरांकडे वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.

Aapla Davakhana
AI In Animation: ॲनिमेशन क्षेत्रात एआयची क्रांती! चित्रांपासून व्हिडिओपर्यंत निर्मिती वेगवान; तरुणांसाठी नव्या संधी

त्यापैकी पाच दवाखाने पनवेलला, तर एक दवाखाना कोल्हापूरला महापालिका हद्दीत वर्ग करण्यात येत असल्याचे पत्रक आरोग्य विभागाने काढले. मात्र, ढिसाळ प्रशासनाच्या या कारभाराचा फटका सामान्य पुणेकरांना बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, महापालिकेच्या कारभारातील त्रुटीही समोर आल्या आहेत.

Aapla Davakhana
Maharashtra Winter Forecast: महाराष्ट्रात गुलाबी थंडीला आणखी विलंब! १२ नोव्हेंबरनंतरच गारठा वाढण्याचा अंदाज; चक्रीवादळाचा परिणाम

राज्यातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ११ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार ७०० ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी ६८८ दवाखाने कार्यान्वित झाल्याच्या माहितीबाबत निर्णय घेण्यात आला. पुणे महापालिका हद्दीत लोकसंख्या क्षमतेनुसार २०२३ मध्ये ५८ आपला दवाखन्यांना मंजुरी देण्यात आली.

Aapla Davakhana
Pune Internal Ring Road: पुणे रिंगरोडची प्रतीक्षा कायम! १९९७ पासूनचा प्रकल्प अजूनही भूसंपादनात; बांधकाम कधी सुरू होणार?

मात्र, पुण्यात या दवाखान्यांसाठी जागा निश्चित करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्या टप्प्यात ४५ दवाखान्यांसाठी जागा निश्चित करण्याचे निश्चित करण्यात आले. तत्कालीन आयुक्त यांनी जागेची उपलब्धता आणि निधी यांसारख्या अडचणींमुळे योजनेच्या अंमलबजावणीला विलंब होत असून, भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला. मात्र, राज्य शासनाकडून भाडेतत्त्वावर जागेऐवजी महापालिकेच्या मोकळ्या पडक्या अवस्थेत असलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करून या ठिकाणी हे दावाखाने सुरू करावेत, असे निर्देश दिले.

Aapla Davakhana
Pune Firecracker Stalls: पुणे महापालिकेच्या फटाका स्टॉल्सच्या उत्पन्नात मोठी घट; यंदा ४५.८३ लाखांची कमाई

सद्य:स्थिती काय?

जागेअभावी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेला घरघर लागत असताना नवीन आयुक्त नवल किशोर राम यांनी पुन्हा राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून तातडीने भाडेतत्त्वावर दवाखाने सुरू करण्याचे नियोजन केले. याला राज्य शासनाकडून निकषांनुसार मंजुरी मिळाल्याने वर्षभरात २५ पैकी १९ दवाखाने सुरू झाले आहेत. उर्वरित सहा दवाखान्यांबाबत कुठलीच निश्चितता होत नसल्याने अखेर बैठकीत हे दवाखाने अन्य महापालिका क्षेत्रांत वर्ग करण्यास ना-हरकत दिली. त्यानंतर राज्य सरकारने हे दवाखाने पनवेल आणि कोल्हापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.

पुणे महापालिकेच्या हद्दीतील निरनिराळ्या ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेंतर्गत १९ दवाखाने सुरू आहेत. सहा दवाखाने दुसऱ्या महापालिकेमध्ये वर्ग करण्यास ना-हरकत देण्यात आल्याचा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला होता. लोकसंख्या वाढ आणि आवश्यकतेनुसार या योजनेंतर्गत हे दवाखाने सुरू करण्याबाबत आश्वासित करण्यात आले आहे.

डॉ. नीना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news