Chakan Market Onion Prices: चाकण बाजारात कांद्याच्या दरात वाढ; आले, वाटाणा, काकडी व शेवग्याचे भाव घसरले

कांद्याची आवक घटल्याने दर तेजीत; फळभाज्या व पालेभाज्यांच्या किमतीत नरमाई, बाजाराची ५.९० कोटींची उलाढाल
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत घट होऊन दरात वाढ झाली आहे. हिरवी मिरची, चवळी, टोमॅटो व दोडक्याची भरपूर आवक झाली. अद्रक, वाटाणा, काकडी व शेवगा यांचे भाव गडगडले आहेत. फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. एकूण उलाढाल कोटी ९० लाख रुपये झाली.

Onion
Pune Fish Prices: मासळीची आवक निम्म्यावर; पुण्यात माशांचे दर दुप्पट, चिकनही महागले

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १ हजार क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव ७०० ते २ हजार ४०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १ हजार ६०० क्विंटल झाली. बटाट्याचा कमालभाव १ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. लसणाला १५ हजार रुपये कमालभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३१० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा- एकूण आवक १ हजार क्विंटल. भाव क्रमांक- १. २ हजार ४०० रुपये, भाव क्रमांक २. १ हजार ७०० रुपये, भाव क्रमांक ३. ७००. बटाटा- एकूण आवक-‌ १ हजार ६०० क्विंटल. भाव क्रमांक १. १ हजार ५०० रुपये, भाव क्रमांक २. १ हजार १०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.

Onion
National Teacher Award 2026: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी स्व-नामांकन प्रक्रिया सुरू; १० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

फळभाज्या: फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रती १० किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो- ३१६ क्विंटल (१ हजार ५०० ते २ हजार ५००), कोबी- १९० क्विंटल (१ हजार ५०० ते २ हजार), फ्लॉवर- १६० क्विंटल (१ हजार ५०० ते २ हजार ५००), वांगी- १०४ क्विंटल (१ हजार ५०० ते २ हजार ५००), भेंडी- ८६ क्विंटल (३ हजार ते ४ हजार), दोडका- ५८ क्विंटल (४ हजार ते ५ हजार), कारली- ६८ क्विंटल (३ हजार ते ५ हजार), दुधी भोपळा- ४६ क्विंटल (१ हजार ५०० ते २ हजार ५००), काकडी- ९८ क्विंटल (२ हजार ५०० ते ३ हजार ५००), फरशी- १० क्विंटल (८ हजार ते १२ हजार), वालवड- ९ क्विंटल (७ हजार ते ९ हजार), ढोबळी मिरची- १०८ क्विंटल (४ हजार ते ६ हजार), चवळी- ४० क्विंटल (२ हजार ते ३ हजार ५००), वाटाणा- ५० क्विंटल (८ हजार ते १० हजार), शेवगा- २० क्विंटल (६ हजार ते ८ हजार), गाजर- १७० क्विंटल (१ हजार ५०० ते २ हजार ५००), आले- १८० क्विंटल (५ हजार ते ७ हजार).

Onion
Urban Co-operative Banks Loan Policy: नागरी सहकारी बँकांच्या कर्ज मर्यादांवर पुनर्विचाराची मागणी; अमित शहा यांचे सकारात्मक आश्वासन

पालेभाज्या: चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी- एकूण ५ हजार ६८० जुड्या (१ हजार ४०० ते २ हजार), कोथिंबीर- एकूण २१ हजार ८५० जुड्या (१ हजार ते १ हजार ८००), शेपू- एकूण २ हजार ५८० जुड्या (१ हजार २०० ते १ हजार ८००), पालक- एकूण ४ हजार ५५ जुड्या (६०० ते १ हजार रुपये).

Onion
Physical Education Book: चौथीच्या ‘शारीरिक शिक्षण व निरामयता’ पुस्तकातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

जनावरे: बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४२ जर्सी गायींपैकी ३८ गायींची विक्री झाली. (१५ हजार ते ७० हजार), ५५ बैलांपैकी ४५ बैलांची विक्री झाली. (१० हजार ते ४० हजार), ९५ म्हशींपैकी ८५ म्हशींची विक्री झाली. (३० हजार ते ८० हजार), ११ हजार ९२० शेळ्या-मेंढ्यापैकी ११ हजार ६०० शेळ्यांची विक्री झाली असून, त्यांना २ हजार रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news