

मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि. 13) एकूण 11 हजार 975 डाग तरकारी शेतमालाची आवक झाली. मात्र, सततच्या पावसामुळे बाजारात येणार्या मालाची आवक काहीशी मंदावली असून, त्यामुळे काही मालांना चांगला बाजारभाव मिळाल्याचे चित्र आहे. विशेषतः फ्लॉवरला (फुलकोबी) 10 किलोसाठी 155 ते 301 रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी ही माहिती दिली. (Latest Pune News)
तरकारी शेतमालाचे रविवार, दि. 13 जुलैचे बाजारभाव 10 किलोसाठी (आवक डाग व बाजारभाव) पुढीलप्रमाणे : कारले - 242 डाग - 315 ते 550 रुपये, गवार - 510 डाग - 560 ते 1100 रुपये, घेवडा - 41 डाग - 700 ते 1100 रुपये, चवळी - 203 डाग - 300 ते 550 रुपये, ढोबळी मिरची - 300 डाग - 370 ते 700 रुपये, भेंडी - 298 डाग - 340 ते 651 रुपये, फरशी - 173 डाग - 500 ते 1001 रुपये, फ्लॉवर (फुलकोबी) - 4102 डाग - 155 ते 301 रुपये, भुईमूग शेंगा - 611 डाग - 200 ते 700 रुपये, दोडका - 84 डाग - 350 ते 650 रुपये, हिरवी मिरची - 385 डाग - 505 ते 860 रुपये, तोंडली - 17 डाग - 370 ते 600 रुपये, लिंबू - 9 डाग - 100 ते 300 रुपये, काकडी - 939 डाग - 280 ते 550 रुपये, कोबी - 600 डाग - 85 ते 150 रुपये, वांगी - 60 डाग - 425 ते 700 रुपये, दुधी भोपळा - 80 डाग ड्ढ 190 ते 350 रुपये, बीट - 773 डाग - 160 ते 300 रुपये, आले - 42 डाग - 210 ते 320 रुपये, टोमॅटो - 197 डाग - 250 ते 460 रुपये, मका - 916 डाग - 120 ते 200 रुपये, पावटा - 8 डाग - 750 ते 900 रुपये, डांगर भोपळा - 11 डाग - 40 ते 90 रुपये, वालवड - 3 डाग - 1100 रुपये, राजमा - 1 डाग - 1120 रुपये, पापडी - 4 डाग ड्ढ 700 रुपये, बटाटा - 6 डाग - 150 रुपये, शेवगा - 7 डाग - 500 ते 700 रुपये. वरील बाजारभावांची माहिती बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.