पुणे : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुसाट

पुणे : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुसाट
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या दोन मार्गावर 'भारत एक्स्प्रेस ' दिनांक 11 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाल्या. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत 1 लाख 259 प्रवाशांनी यामधून प्रवास केला. यातून रेल्वेला 8 कोटी 60 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

असा मिळाला प्रतिसाद

  • मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक-22225) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील 26 हजार 28 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 7 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
  • सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 2 (गाडी क्रमांक-2226) सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील 27 हजार 520 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 23 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
  • मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक-22223) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील 23 हजार 296 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 5 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
  • साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक-22224 ) : साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून 23 हजार 415 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

एका महिन्यात प्रवासी संख्या लाखांवर
तब्बल 8 कोटी 60 लाख रुपयांचा महसूल
मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी दोन्ही गाड्यांना मोठा प्रतिसाद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news