वडगावचा रेल्वे भुयारीमार्ग मार्गी लावा; गटनेते ढोरे यांची रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे मागणी

वडगावचा रेल्वे भुयारीमार्ग मार्गी लावा; गटनेते ढोरे यांची रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे मागणी

वडगाव मावळ(पुणे) : वडगाव शहरातील प्रलंबित रेल्वे भुयारी मार्ग, प्रस्तावित उड्डाणपूल, पादचारी मार्ग आदी कामे मार्गी लावावीत, अशी मागणी भाजपचे गटनेते दिनेश ढोरे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात गटनेते दिनेश ढोरे यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे, की वडगाव नगरपंचायतच्या हद्दीतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या केशवनगर रेल्वे भुयारीमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच, वडगाव रेल्वे स्टेशनवरील स्काय वॉक पदाचारी मार्ग हा आठवडे बाजारात साठी ये-जा करणार्‍या केशवनगर भागातील महिलांसाठी करावा, अशी मागणी केली आहे.

उड्डाणपुलाचे काम मार्गी लावा

याशिवाय शहराच्या प्रस्ताविक विकास योजनेच्या आराखड्यामध्ये रेल्वे लाईन वरून उड्डाणपूल बांधण्याचे आरक्षण प्रस्तावित केले आहे. संबंधित उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, रेल्वे स्टेशनवरून पुणे-लोणावळासाठी नागरिक दररोज ये-जा करत असतात, रेल्वे स्टेशनवर अप-डाऊन साईडचे प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरती रेल्वे लोकल पायरीमधील अंतर खूप असल्यामुळे महिलांना लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना प्लॉटफॉर्मवरती गाडी पकडणे उतरणे खूप अवघड जात आहे. त्यामुळे स्थानकावरील दोन्ही बाजूच्या प्लॅटफॉर्मची उंची तातडीने वाढवावी, अशीही मागणी केली आहे.

पुणे-लोणावळा लोकल फेर्‍या वाढवा

कोरोना काळात बंद झालेल्या पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या काही फेर्‍या अजूनही बंद आहेत. त्यामुळे तालुक्यातील कामगार, विद्यार्थी, दुग्धव्यसायिक, महिला यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लोकलच्या सर्व फेर्‍या पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे, महिलाध्यक्षा धनश्री भोंडवे व राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राहील तांबोळी यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news