Narhe Development Issue: नऱ्हे विकासाच्या दृष्टिक्षेपात येणार कधी?

रस्ते-डीपी रोड, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, पूरस्थिती, कचरा व्यवस्थापनासह अनेक समस्या कायम — आगामी महापालिका निवडणुकीत नऱ्हेच्या विकासाचा मुद्दा निर्णायक
Narhe Development Issue
Narhe Development IssuePune
Published on
Updated on

दत्तात्रय नलावडे, मिलिंद पानसरे

प्रभाग क्रमांक : 34 नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी

वडगाव, धायरी या भागात महापालिकेच्या माध्यमातून काही विकासकामे झाली असली, तरी नव्याने समाविष्ट झालेले नऱ्हे गाव अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये सोसायट्या, गावठाण आणि वस्ती भाग असा संमिश्र भाग असून, विविध भागांतील समस्याही वेगवेगळ्या आहेत. धायरीतील डीपी रस्ते अद्यापही अर्धवट आहेत. नऱ्हे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक कंटाळले आहेत, यासह पाणीपुरवठा, कचरा, अतिक्रमणे, स्वच्छतागृहांचा अभाव, पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती आदी समस्या या प्रभागात कायम आहेत.

Narhe Development Issue
Dr. Anand Karandikar Passes Away: जेष्ठ विचारवंत, लेखक डॉ. आनंद करंदीकर यांचे निधन

सिंहगड रस्त्यावर नव्याने उभारण्यात आलेला पूल, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, ठिकठिकाणी असलेली उद्याने, महापालिकेच्या जुन्या हद्दीत गल्लोगल्ली झालेले रस्ते आदींमुळे वडगाव, धायरी परिसराचा विकास झाल्याचे वरवर वाटत आहे. मात्र नाल्यांना आलेले गटाराचे स्वरूप, रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज लाइनची दुरवस्था आणि दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

नऱ्हे गावात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या वाहनांचे व मालमत्तेचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतरही नऱ्हे येथील रहिवाशांना रस्ते, ड्रेनेज लाइन, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पथदिवे अशा मूलभूत सुविधांची अद्यापही प्रतीक्षा आहे. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी शंभर सदनिका असलेल्या सोसायट्यांना दर महिन्याला सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक खर्च येत आहे. वडगाव आणि धायरीच्या तुलनेत नऱ्हे गावाचा विकास कमी झाला असून, हा भाग विकासाच्या दृष्टिक्षेपात कधी येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नऱ्हे गावच्या विकासाचा मुद्दा आगामी महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

Narhe Development Issue
Asim Sarode | ॲड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची स्थगिती

या प्रभागात असलेला नवले पूल हा भाग अतिधोकादायक असून, गेल्या काळात या ठिकाणी झालेल्या अपघातांत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणार कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

माननीयांनी द्यावीत या प्रश्नांची उत्तरे

सिंहगड मुख्य रस्त्यासह धायरी, वडगाव बुद्रुक, नऱ्हे रस्त्यावरील अतिक्रमणे का हटविली गेली नाहीत? वडगाव बुद्रुक येथे भाजीमंडई असतानाही कालवा रस्त्यावर अनधिकृत मंडई कशी काय सुरू आहे? वाहतूक कोंडी, डीपी रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून का रखडला आहे? नाल्यांतून सांडपाणी का वाहते आणि त्यांचे अस्तित्व का धोक्यात आले आहे? नवले पूल, नऱ्हेतील श्री कंट्रोल चौक, लाडली चौक, उंबऱ्या गणपती चौक, मानाजीनगरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार?

Narhe Development Issue
Glucose Monitoring Device: सुई न टोचता ‘शुगर’ मोजणार स्मार्ट डिव्हाइस; ‘ईझी टच प्लस’ला मानाचा अंजनी माशेलकर पुरस्कार

प्रभागातील प्रमुख समस्या

धायरीतील अर्धवट डीपी रस्ते

नऱ्हे गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था

महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी

नऱ्हे येथील मुख्य रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण, डांबरीकरण

चोवीस तास पाणीपुरवठा योजना अद्यापही पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही

वडगाव बुद्रुक येथील कालवा रस्त्यावरील अनधिकृत भाजीमंडई

धायरी मुख्य रस्ता, नऱ्हे रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी

वीर बाजी पासलकर चौकात पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती

रस्त्यांवर ठिकठिकाणी साचणारे कचऱ्याचे ढीग

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव

नऱ्हे परिसरात महापालिकेचा सुसज्ज दवाखाना नाही

Narhe Development Issue
Panshet Encroachment Action: स्वतःहूनच अतिक्रमणे काढणे सुरू

प्रभागात झालेली प्रमुख विकासकामे

धायरी मुख्य रस्त्याचे रुंदीकरण

धायरी, वडगाव बुद्रुक परिसरात झालेली उद्याने

प्रभागात झालेली अनेक अंतर्गत रस्त्यांची कामे

दररोज होणारा पाणीपुरवठा

वडगाव खुर्द येथील अग्निशामक केंद्र

महापालिकेच्या शाळांसाठी सुसज्ज इमारती

जलतरण तलाव सुविधा

नाल्यांवर ठिकठिकाणी पूल व कल्व्हर्ट

Narhe Development Issue
Saswad Municipal Election: सासवडच्या आखाड्यात बंडखोरी रोखण्याचे आव्हान

प्रभागात या भागांचा समावेश

वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक (पार्ट), वडगाव धायरी (पार्ट), अभिरुची ढाबा, सणस विद्यालय, रायकरनगर, गणेशनगर, मधुकोश सोसायटी, राजयोग सोसायटी, दांगट पाटीलनगर, व्यंकटेश वृंदावन सोसायटी परिसर, सुंदर गार्डन परिसर, खाडेवाडी, महादेवनगर, अंबाईदरा, विजयनगर, नांदेड फाटा, नऱ्हे गाव, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज परिसर.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत तीन टाक्यांची कामे मार्गी लावली आहेत. मधुकोश सोसायटी ते महामार्गापर्यंत कॅनॉल रस्त्याचे काम केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, मुरलीधर लायगुडे हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे लसीकरण, प्रसूतिगृह सुरू केले.

राजाभाऊ लायगुडे, माजी नगरसेवक

वडगाव बुद्रुक, धायरी परिसरात नव्याने उच्च दाबाच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. मनपाच्या शाळेची दुरुस्ती आणि रस्ते विकसित करण्याचे कामही केले आहे. वडगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीचा विस्तार करून सुशोभीकरणही केले. अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

नीता दांगट, माजी नगरसेविका

सांस्कृतिक केंद्र, महिला बचत गट, प्रशिक्षण केंद्र, क्रीडा मैदान, वडगाव बुद्रुक येथे भाजीमंडई, बसस्थानक, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक उभारण्यासह विविध विकासकामे केली आहेत. राजाराम पूल ते फनटाइम थिएटरदरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले असून, त्यासाठी पाठपुरावा केला.

हरिदास चरवड, माजी नगरसेवक

वडगाव खुर्द येथे अग्निशमन केंद्र, भिडे उद्यान, वडगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरात लहान- मोठी उद्याने, ड्रेनेज लाइन, पावसाळी वाहिन्या आणि पदपथांच्या दुरुस्तीचे काम केले आहे. नाल्यांचे खोलीकरण व संरक्षण भिंती, मनपा शाळांच्या दुरुस्तीसह अनेक रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कामही मार्गी लावले आहे.

राजश्री नवले, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news