पिंपरी : कोव्हिशिल्डचे आज 8 केंद्रांवर लसीकरण

पिंपरी : कोव्हिशिल्डचे आज 8 केंद्रांवर लसीकरण

Published on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शहरातील 8 केंद्रांवर शनिवारी (दि. 20) कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर 400 लस देण्याची सोय करण्यात आली आहे.  सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 या वेळेत करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसीच्या साठ्यानुसार 18 वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने 50 टक्के दिले जातील. तर, 50 टक्के डोस हे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर गरोदर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news