

पेठ; पुढारी वृत्तसेवा: भारतीय जनता पक्ष व अटलबिहारी वाचपेयी विचार मंचमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे औचित्य साधत आंबेगाव तालुक्यातील पेठ, कारेगाव, भावडी, कोल्हारवाडी येथील शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, मंचर अध्यक्ष गणेश बाणखेले, उद्योजक अशोकराव बाजारे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुशांत थोरात, तुषार बाणखेले, महेश पिंगळे, नितीन कराळे,पांडुरंग कराळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
या लसीकरणासाठी भाजप अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी संपूर्ण लस मोफत दिली आहे. या लसीकरणासाठी संपूर्ण आंबेगाव तालुक्यात भाजप पदाधिकारी वेळोवेळी मदत व सहकार्य करतील, असे आश्वासन जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी दिले. आंबेगाव तालुक्यात लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाजप कार्यकत्र्यांनी मोफत लम्पी लसीकरणाचे नियोजन केले आहे. तसेच शेतकरी वर्गामध्ये लम्पी रोगाच्या संदर्भात जनावरांची घ्यायची काळजी व जनजागृती करत आहे.
पशुसंवर्धन विभाग व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित सुकाळे, डॉ. गंगाराम हाके, डॉ. नितीन ढेरंगे, डॉ. सी. एन. बांबळे यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे. शेतकरी यांना लसीकरणसंदर्भात मदत लागल्यास भाजप संपर्क कार्यालय मंचर येथे संपर्क करावा, असे आवाहन संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले यांनी केले आहे.