

पुणे: पुणे शहरामधून अमेरिकेला शहर आणि चिंचवड या शहरात असलेल्या मुख्य टपाल कार्यालयातील पार्सल विभागातून रोज सुमारे वीसहून अधिक पार्सल तसेच स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र पाठविण्यात येत असतात. मात्र, केंद्र शासनाने अमेरिकेला पाठविण्यात येणार्या सर्व सेवेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे टपाल कार्यालयास लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
अमेरिकेने भारतावर टॅरिफ निर्बध लागू केले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील आर्थिक देवाण घेवाण तसेच व्यापार उदीम प्रक्रिया स्थगित केली आहे. ही बाब लक्षात घेऊन भारताने देखील देशातून अमेरिकेत जात असलेली टपाल विभागाची सर्व सेवा स्थगित ठेवल्या आहेत. त्यामुळे याचा टपाल कार्यालयास चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. (Latest Pune News)
पुण्यातील जी.पी.ओ. शहर मुख्य कार्यालय, मार्केट यार्ड येथे टपाल विभागाची मुख्य कार्यालये आहेत.या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पार्सल सुविधांच्या माध्यमातून पुण्यातून दररोज अमेरिकेला पार्सल पाठविण्यात येत असतात. त्यामध्ये खाण्याचे पदार्थ, कपडे तसेच भांडी यांचा समावेश जास्त आहे. याबरोबर स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्रे याचाही समावेश आहे. दरम्यान, पुण्यातील अमेरिकास्थित नागरिकांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे जी.पी.ओ.मधून रोज किमान 7 ते 8, बुधवार पेठ येथे असलेल्या शहर मुख्य कार्यालयामधून 3 ते 4, मार्केट यार्ड मधून 3 ते 4 तसेच चिंचवड येथील कार्यालयातून किमान 2 ते 3 पार्सल अमेरिकेला पाठविण्यात येत आहेत. ही पार्सल पाठविण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येत असतो. मात्र अमेरिकेला पार्सल आणि इतर पोस्टेज पाठविण्याची सेवा पाठविण्यास स्थगिती दिल्यामुळे शहरातील टपाल विभागास लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.