पुणे : निरेत सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पाऊस

पुणे : निरेत सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पाऊस
Published on
Updated on

निरा : पुढारी वृत्तसेवा :  निरा (ता. पुरंदर) येथे बुधवारी (दि. 15) संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारी अडीचपासून ढगाळ वातावरण झाले होते, तर आकाश काळेभोर झाले होते. दुपारी साडेचारनंंतर जोरदार वारा सुटला, ढगांचा गडगडाट सुरू होता. संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
दर बुधवारी निरा येथील आठवडे बाजार भरतो.

त्यामुळे आठवडे बाजारास आलेल्या नागरिकांची धांदल उडाली, तर शेतकर्‍यांंची दैना उडाली. बर्‍याच नागरिकांना बाजार आटोपता घेऊन घरी परतावे लागले. आठवडे बाजारात शेतक-यांनी व व्यापा-यांनी विक्रीस आणलेल्या शेतीमाल व फळ विक्रेत्यांना कमी दरात माल विकावा लागला. दरम्यान, निरा व परिसरात बुधवारी झालेल्या सोसाट्याच्या वा-यासह अवकाळी पावसाचा परिणाम ऊसपिकांवर व काढणीस आलेला गहू, हरभ-यावर झाला. शेतमालाचे नुकसान झाल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news