सांस्कृतिक राजधानीत महिलांसाठी असुरक्षितच! अत्याचाराचा आलेख वाढता

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सांस्कृतिक राजधानीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड तसेच शाळकरी मुलींचा पाठलाग, अशा घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. रूम पार्टनर आणि कॅन्टीन कर्मचार्‍याच्या त्रासाला कंटाळून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या महाविद्यालयीन तरुणीने पेटवून घेतल्याची घटना ताजी असतानाच तीन दिवसांत शहरात महिला अत्याचाराच्या 19 घटना घडल्या आहेत. मंगळवारी तब्बल नऊ महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाल्यानंतर बुधवारी विविध पोलिस ठाण्यांत सहा लैंगिक अत्याचार आणि विनयभंगासंबंधी घटना दाखल झाल्या तसेच गुरुवारी देखील त्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पाहा या घटना अधोरेखित करतात

  1.  तरुणीच्या घरात घुसून विनयभंग

तरुणीच्या घरात घुसून अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची घटना पाषाणमधील सुतारवाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ऋतिक आरटू काळे (रा. विठ्ठलनगर, पाषाण) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

2. अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने बुधवारी (दि. 20) विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनिकेत बालाजी कांबळे (वय 23, रा. धानोरी) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

3.  विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग

मुलीला क्लासला सोडून घरी जाणाऱ्या विवाहित महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना खराडी परिसरातील दुर्गामाता चौकाजवळ घडली. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी दीपक विष्णू वाकचौरे (वय 44, रा. साईनगरी, चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी

अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घातली. पीडित मुलीच्या आईने तरुणाला समजावून सांगितले असता त्यांना देखील जिवे मारण्याची धमकी दिली. उरुळी देवाचीमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित मुलीच्या 40 वर्षीय आईने बुधवारी (दि. 20) लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून तेजस थोरात (वय 20, रा. आदर्शनगर, देवाची उरुळी) याच्यावर विनयभंगासह पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news