पुणे
पुणे : आळंदीत अल्पवयीन तीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
आळंदी; पुढारी वृत्तसेवा : तीन अल्पवयीन मुलांवर महाराजाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना आळंदीत उघडकीस आली. या महाराजावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर उर्फ आळंदीकर (वय ५२, रा. आळंदी ) असे अटक केलेल्या महाराजाचे नाव आहे.
आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांवर दासोपंत या महाराजाने अनैसर्गिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच या महाराजावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
हेही वाचा :

