

भामा-आसखेड: भांबोली (ता. खेड) ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून पूर्ण केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण शुक्रवारी (दि. 9) केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती गावच्या सरपंच शीतल काळुराम पिंजन यांनी दिली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे अध्यक्षतेखाली होत असलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी महसूल राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे व परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे संचालक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Latest Pune News)
भांबोली ग्रामपंचायतने ग्रामनिधीतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले आहेत. यामध्ये दशक्रिया घाट व स्नानगृह, प्रवचन शेड, दशक्रिया विधी शेड, महादेव मंदिर, समाजमंदिर, ओझोन घंटागाडी, व्यायामशाळा, खुली व्यायामशाळा, गार्डन खेळणी, ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, बंदिस्त गटार योजना, पाण्याची टाकी, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, 40 सोलर वॉटर हीटर, स्वयंपाकगृह व जेवणासाठी शेड, स्ट्रीट लाइट, सौर पथदिवे, जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी योजना, घरकुल योजना आदी कामांचा समावेश आहे.