पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : रस्ता ओलांडणार्या महिलेला दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि. 19) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली.
ओंकार सुनील सोनावणे (वय 20) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश आंबवणे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर थंडा मामला हॉटेलसमोर आरोपी महिला रस्ता ओलांडत होती. त्या वेळी ओंकार सोनवणे चालवत असलेल्या दुचाकीची महिलेला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी होऊन ओंकार यांचा मृत्यू झाला. आरोपी महिला देखील यामध्ये जखमी झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा