.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बारामती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन यादीत समावेश होणे ही शिवप्रेमींसह महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी अभिमानास्पद व आनंदाचीच बाब असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी अजित पवारांनी, अनेक सरकारे आली-गेली; पण बरेच जण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, हे महाराष्ट्राने बघितले आहे, असा टोलाही लगावला. महाराजांचे नाव घेऊन राजकीय पोळी भाजून घेणार्यातले आम्ही नाही. आमच्या सरकारने यात लक्ष घातले. (Latest Pune News)
गड-किल्ल्यांसाठी निधीची तरतूद केली. जिल्हा नियोजन विकास मंडळातून देखील खर्च करता येईल, असा निर्णय घेतला. सांस्कृतिक खात्याचे सचिव विकास खर्गे यांनी तिकडे पाठविले. त्यांनीच काल मला ही बातमी दिली. अतिशय आनंदाची ही बाब आहे. सगळ्यांनी प्रयत्न केला त्याचे समाधान आहे.
महाराज जाऊन आता 395 वर्षे झाली; पण त्यांचा इतिहास, जीवनकार्य पुढच्या पिढ्यांसाठी टिकले पाहिजे, यासाठी हा समावेश गरजेचा होता. हे काम आता झाले आहे. त्यांच्या काही गाइडलाइन असतात. त्याप्रमाणे पुढील काम होईल, असे पवार म्हणाले.
जयंत पाटलांवर भाष्य टाळले
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पद सोडल्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर काहीही भाष्य न करता अजित पवार पुढे निघून गेले.