Pahalgam Terror Attack: ...म्हणून आम्ही वाचलो; उंड्री, उरळी देवाची, ससाणेनगर परिसरातील पर्यटकांची भावना

भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Pahalgam Terror Attack
...म्हणून आम्ही वाचलो; उंड्री, उरळी देवाची, ससाणेनगर परिसरातील पर्यटकांची भावनाPudhari
Published on
Updated on

कोंढवा: पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला केला त्या दिवशी (मंगळवारी) सायंकाळी आम्ही तेथे मुक्कामाला जाणार होतो. मात्र, घडलेला प्रकार समजताच आम्ही श्रीनगर येथेच मुक्काम केल्यामुळे आम्ही वाचलो. सध्या लष्कर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गस्त घालत असून, सर्वांना बिनधास्त राहण्याचे आवाहन केले जात आहे, अशी माहिती श्रीनगर येथून सुभाष कड यांनी मोबाईलवर बोलताना दिली.

उंड्री, उरळी देवाची, ससाणेनगर येथील सुभाष कड, रेखा कड, उरळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो कृती समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे, सुरेखा भाडळे, सुधीर ससाणे, भाग्यश्री ससाणे, धनश्री ससाणे हे पर्यटनासाठी काश्मीरला गेले आहेत. दहशतवादीद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला, त्याच दिवशी सायंकाळी हे सर्व पहलगाम या ठिकाणी मुक्कामाला जाणार होते. मात्र, घडलेला प्रकार समजला आणि त्यांनी श्रीनगर येथेच सुरक्षित ठिकाणी मुक्काम केला असून, ते तातडीने परत आपल्या घरी येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack: तब्बल 15 ते 20 मिनिटे चालले मृत्यूचे तांडव; आसावरी यांनी सांगीतला 'तो' भयावह प्रसंग

दहशतवाद्यांचा हा हल्ला भ्याड असून, हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारने तातडीने पाकिस्तानच्या नाग्या ठेचायला हव्यात. घडलेला प्रकार भयानक आहे. यापुढे येथे पर्यटनाला येणार्‍यांची संख्या निश्चित घटणार असून, भीतीच्या छायेखाली काश्मीर कोण येईल? सध्या काश्मीरमधील परिस्थिती निवळली असून, शांतता आहे.

मोठ्या प्रमाणात लष्कराची गस्त सुरू आहे. स्थानिक व्यावसायिक संताप व्यक्त करत आहेत. करनेवाला करके गया... हमारे पेट पर भी लात मार कर चला गया, अशा भावना येथील दुकानदार आमच्याशी बोलताना व्यक्त करीत आहेत. जवळपास अर्ध्याहून जास्त पर्यटकांनी काश्मीर सोडले असून, अनेक जण परतीच्या मार्गाला लागले असल्याची माहिती भगवान भाडळे यांनी मोबाईलवर बोलताना दिली.

Pahalgam Terror Attack
शाहरुख तू मुस्लिम, हल्लेखोरही मुस्लिमच; पण तुमच्यात आणि त्यांच्यात एवढा फरक कसा रे?

भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दत्तनगर येथील चौकात जनआक्रोश उसळला. आंबेगाव खुर्द व बुद्रुक, कोळेवाडी, जांभूळवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या क्रूर हल्ल्याचा निषेध केला.

भारतमाता की जय, वंदे मातरम आदी घोषणांनी परिसरातील वातावरण राष्ट्रभक्तिमय झाले होते. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेध आंदोलन करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा असा बंदोबस्त करावा की, कोणी पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, अशा तीव्र भावना या वेळी आंदोलनकर्त्या नागरिकांनी व्यक्त केल्या.

वारजे येथे मृतांना श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्लाचा वारजे येथील स्व. रमेश वांजळे हायवे चौक उड्डाणपुलाखाली निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून लक्ष केले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांना या वेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला. ’भारत माता की जय’ यासह अनेक घोषणा या वेळी देण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गुंडाळ यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ, बजरंग दलाचे अनंत वांजळे, चेतन शेळके, अ‍ॅड. रणजित टेमघरे आदींसह महिला आणि तरुण मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

‘दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करा’

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा औंध येथील परिहार चौकात गुरुवारी निषेध करण्यात आला. या आंदोलनात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागीझाले होते, या प्रसंगी नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध करीत दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

अ‍ॅड. मधुकर मुसळे आणि माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात 365 कलम 370 व 35 (अ) काढल्यानंतर या ठिकाणी विकासाची गंगा सुरू झाली. काश्मीरचा चेहरामोहरा बदलला असून, पर्यटनात वाढ झाली आहे. तेथे गेल्या चार वर्षांत शांतता नांदत असून, स्थानिकांचा व्यवसाय बहरला आहे.

या पोटदुखीतून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये भय निर्माण करण्यासाठी हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकार या हल्ल्याला सडेतोड आणि पाकिस्तानच्या कायम स्मरणात राहील असे उत्तर देईल, असे मत या वेळी अ‍ॅड. मुसळे यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news