Underground canal still stuck in Environment Department approval
खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत कालव्याच्या कामाला गती येईना
सुमारे 34 किलोमीटरचा कालवा
पुणे : पाण्याची गळती थांबावी यासाठी खडकवासला ते फुरसुंगी तयार करण्यात येणारा भूमिगत कालवा पर्यावरण विभागाच्या मान्यतेमध्येच अजून अडकून पडला आहे. त्यामुळे पुढील कामास गती मिळत नसल्याचे दिसून आले आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पामधून पुणे शहर आणि जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामती (काही भाग), हवेली (काही भाग) या तालुक्यांना सिंचन तसेच पिण्यासाठी पाणी देण्यात येते. हे पाणी नवीन उजवा मुठा कालव्याच्या माध्यमातून देण्यात येते. हा कालवा पुणे शहरातून जात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या कालव्याची दुरूस्ती आणि देखाभाल नाही. त्यामुळे या कालव्यामधून पाण्याची गळती होत आहे. तसेच शहरातून वाहणा-या या कालव्याच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहे. पुढील काळात या कालव्याच्या जागेवर रस्ता तसेच मेट्रो सुरू करण्याचा विचार शासन करीत आहे. तसेच खडकवासला ते फुरसुंगी हा भूमिगत कालवा झाल्यास गळती होणारे किमान अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच या भूमिगत कालवा करण्याचा प्रस्ताव पुढे आला.
दरम्यान या भूमिगत कालव्यासाठी ऑगस्ट महिन्यात( मागील वर्षीच्या ) मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यात देण्यात आली होती. तसेच या प्रकल्पासाठी 2 हजार 190 कोटी 78 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी वन आणि पर्यावरण विभागाची मान्यता घेणे बंधनकारक असते.त्यानुसार वन विभागाची मान्यता मिळाली आहे. मात्र पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी पर्यावरन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अजुनही कोणतीही कार्यवाहे झालेली नाही. अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिका-यांनी दिली.