Kawdas Fish Breeding Reservoir: उजनीत इतिहास घडला! ‘कवडस’ देशी माशाची प्रथमच मत्स्यबीज निर्मिती यशस्वी

भिगवण पाणथळ ठरले देशातील पहिले केंद्र; बीएनएचएसच्या संशोधनातून ५० हजारांहून अधिक मत्स्यजिरे तयार, देशी जैवविविधतेला नवी आशा
Kawdas Fish
Kawdas FishPudhari
Published on
Updated on

भरत मल्लाव

भिगवण: अथक प्रयत्न व परिश्रमानंतर कवडस या देशी माशाची पैदास करण्यात बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला यश आले आहे. सन १९५७ साली प्रमुख कार्प माशाचे मत्स्यबीज निर्मिती करून भारतातील शास्त्रज्ञांनी इतिहास घडवला होता. त्यानंतर तब्बल ६९ वर्षांनंतर भारतात तेही कवडस या देशी माशाचे महत्त्वपूर्ण संशोधन पहिल्यांदा भारत देशात झाले आहे.

Kawdas Fish
Baramati Regular Water Supply: बारामतीकरांना दिलासा; शुक्रवारपासून शहरात पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू

विशेष म्हणजे, उजनीतील भिगवण पाणथळ (ता. इंदापूर) हे देशी मासे प्रजनन देशातील पहिले केंद्र ठरले असून, बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे व त्यांची टीम तसेच दै. 'पुढारी'चे पत्रकार व उजनी मत्स्य अभ्यासक भरत मल्लाव यांचेही यामध्ये मोठे योगदान या मत्स्यबीजनिर्मितीसाठी ठरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई व सिप्‍ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशय पाणथळ जागा पुनर्स्थापना आणि मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातून हे देशी माशांचे संशोधन सुरू आहे. उजनीत गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून, लहान आकाराच्या जाळ्यांनी व्यावसायिक मासेमारी सुरू असल्याने प्रमुख कार्प जातींच्या माशांसह देशी नामशेष व दुर्मीळ झाले आहेत. ही बाब लक्ष्यात घेऊन बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने देशी मासे पुनर्स्थापित करण्याचा तसेच सकर व मांगुर या आक्रमक जातीचे मासे हटविण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

Kawdas Fish
Khadakwasla Dam Water Release: खडकवासला विसर्गाने एकतानगरी पुन्हा जलमय; सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये शिरले पुराचे पाणी

या प्रकल्पांतर्गत बीएनएचएसच्या वतीने अंबोली, हिरण्यकेशी या प्रमुख नद्यांसह लहान मोठ्या नदी, तलाव, जलाशयातून नकटा, कवडस, कोळीस, खदरा, बोबरी आदी देशी प्रजनक मासे संकलन केले आहेत. सध्या माशांचा प्रजनन हंगाम सुरू होताच कवडस जातीच्या माशावर लक्ष केंद्रित करून या देशी माशांचे मत्स्यबीज तयार करण्यात पहिल्यांदाच यश आले आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने बारकाईने अभ्यास व निरीक्षण केल्यानंतर जवळपास ५० हजारांहून अधिक मत्स्यजिरे मिळाले आहे. त्यानंतर या माशांचे प्रजननात वाढ करून दरवर्षी पाच ते सात कोटी मत्स्यजिरे तयार करण्याचा मानस करण्यात आला आहे.

भारतासाठी देशी माशांचे हे संशोधन सुवर्णक्षण बनला असून, आता पुढील टप्पा निवडलेल्या बारा प्रजातींकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या देशी मासे मत्स्यबीजनिर्मितीसाठी बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे, स्थानिक अभ्यासक आणि प्रकल्प सहयोगी भरत मल्लाव यांचे महत्त्वाचे योगदान ठरले आहे.

Kawdas Fish
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ५१ टक्क्यांवर; अतिवृष्टीने चार धरणांत पाण्याची विक्रमी आवक

याबाबत अधिक माहिती अशी की, बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई व शिपला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशय पाणथळ जागा पुनर्स्थापना आणि मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातून हे देशी माश्याचे संशोधन सुरू आहे. उजनीत गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून, लहान आकाराच्या जाळ्यांनी व्यावसायिक मासेमारी सुरू असल्याने प्रमुख कार्प जातींच्या माश्यांसह देशी नामशेष व दुर्मीळ झाले आहेत. ही बाब लक्ष्यात घेऊन बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने देशी मासे पुनर्स्थापित करण्याचा तसेच सकर व मांगुर या आक्रमक जातीचे मासे हटविण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पांतर्गत बीएनएचएसच्या वतीने अंबोली, हिरण्यकेशी या प्रमुख नद्यांसह लहान मोठ्या नदी, तलाव, जलाशयातून नकटा, कवडस, कोळीस, खदरा, बोबरी आदी देशी प्रजनक मासे संकलन केले आहे. सध्या माश्यांचा प्रजनन हंगाम सुरू होताच कवडस जातीच्या माश्यावर लक्ष केंद्रित करून या देशी माश्यांचे मत्स्यबीज तयार करण्यात पहिल्यांदाच यश आले आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने बारकाईने अभ्यास व निरीक्षण केल्यानंतर जवळपास ५० हजाराहून अधिक मत्स्यजिरे मिळाले आहे. त्यानंतर या माश्याचे प्रजननात वाढ करून दरवर्षी पाच ते सात कोटी मत्स्यजिरे तयार करण्याचा मानस करण्यात आला आहे.

भारतासाठी देशी माश्यांचे हे संशोधन सुवर्णक्षण बनला असुन, आता पुढील टप्पा निवडलेल्या बारा प्रजातीकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या देशी मासे मत्स्यबीज निर्मितीसाठी बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे , वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे, स्थानिक अभ्यासक आणि प्रकल्प सहयोगी भरत मल्लाव यांचे महत्वाचे योगदान ठरले आहे.

Kawdas Fish
Pune Palkhi Procession: पुणे नगरी विठ्ठलनामात रंगणार; ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

यशाचा आनंद; पण आव्हानात्मक काम बाकी : डॉ. काटवटे

कृष्णेच्या बहुतांश भागातून विशेषतः उजनीतून ३० ते ३५ देशी माशांच्या जाती नष्ट व काही दुर्मीळ झाल्या आहेत. त्यातील कवडस जातीच्या माशाचे मात्स्यबीज निर्मिती करण्यात यश आले असले तरी उर्वरित निवडलेल्या ११ माशांच्या जातीचे मत्स्यबीज निर्माण करणे आव्हान आहे. राज्यातील भिगवण हे पाणथळ जागेचे महत्त्वाचे पक्षिक्षेत्र असून, हा प्रकल्प केवळ जैवविविधतेच्या संवर्धनासाठीच नाही, तर स्थानिक मच्छीमारांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत जलाशयातील जैवविविधतेला धोका ठरणाऱ्या जलपर्णी, इपोमिया आदी आक्रमक वनस्पती काढून टाकून त्याजागी जैवविविधतेला पोषक वनस्पती देखील पुनर्स्थापित केल्या जाणार आहेत. यासाठी बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि महाराष्ट्र जलसंपदा विभाग यांनी या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला आहे.

...तर देशासाठी आदर्श: किशोर रिठे

या महत्त्वपूर्ण देशी मत्स्यबीजनिर्मितीनंतर बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी आनंद व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या बोर्डावर सचिवालयाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्रतील सर्व प्रदूषित नद्या पुनर्जीवित करणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी स्थानिक आणि संकटग्रस्त प्रजाती वाचवणे आणि वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उजनी पाणलोटक्षेत्रात आम्ही राबवत असलेला पाणथळ जागा आणि स्थानिक मत्स्यबीज प्रकल्प हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही, तर देशभरातील प्रदूषित झालेल्या नद्यांचा आदर्श ठरणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news